.... राजकारण हे पैसा वसुली धंदा झाले आहे. राजकारणात उतरले की श्रीमंती येते कशी? याचे अप्रूप अनेकांना वाटत असते. परंतु, राजकीय नेत्यांकडे आलेली श्रीमंती म्हणजे आपल्याच खिशाची झालेली लूट असते, हे किती लोकांच्या लक्षात येते. राजकारणी मंडळी मोठ्या अभिमानाने त्यांची संपत्ती जाहीर करत असतात. परंतु, त्यांची ही संपत्ती म्हणजे जनतेचीच लूट आहे, हे जोपर्यंत लोकांच्या लक्षात येणार नाही, तोपर्यंत त्यांच्या संपत्तीचे आकडे दरपाच वर्षाला दुप्पटीने होण्याचे सत्र थांबणार नाही. ...... अलिकडे राजकारण हा झटपट श्रीमंत होण्याचा मार्ग ठरले आहे. ज्या लोकांकडे एकेकाळी फुटकी कवडी नव्हती अशी माणसे राजकारण कोट्यधीश झालेली दिसतात. हा चमत्कार होतो कसा? याचे उत्तर शोधता सापडत नाही. परंतु, राजकारण हे सभ्य लोकांचे क्षेत्र राहिले नाही, असे जे म्हटले जाते त्यातच या राजकारणातील गौडबंगालाचे उत्तर दडलेले असावे. दोन नावे प्रामुख्याने अशी समोर येतात, की कधीकाळी ही व्यक्तिमत्वे फार हलाखीचे, गरिबीचे जीवन जगत होती. परंतु, आता त्यांच्याकडे गडगंज संपत्ती आहे. ही नावे प्रातनिधीक स्वरुपाची असली तरी गल्लीबोळातील नेता झाला तरी या नेत...