पोस्ट्स

डिसेंबर, २०१२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
इमेज
महाराष्ट्राच्या भूमीने या दोन सुपुत्रांना जन्म दिला. या दोन्ही महाननेत्यांचा थरार अन् उदंड लोकप्रियता मी अनुभवलेली आहे. मी देवाला धन्यवाद देतो, की पत्रकारिता करताना या दोन्ही नेत्यांना मला जवळून पाहाता आले, त्यांना अनुभवता आले.
इमेज
बरे झाले विरोधकांचे तोंड फुटले! ... शेतकर्‍यांचे आर्थिक आरिष्ट्य दूर करणारे रिटेलमधील एफडीआय ही काळाची गरज होती. या एफडीआयला विरोधकांनी विरोध करुन अपशकुन घडविला होता. या मुद्द्यावर विरोधकांनी दाखल केलेला प्रस्ताव संसदेच्या दोन्ही सभागृहात पराभूत झाला, हे फार चांगले झाले. रिटेलमधील एफडीआयवर केंद्र सरकारने संसदेचे शिक्कामोर्तब घेऊन विरोधकांचे चांगलेच तोंड फोडले आहे. ..... किरकोळ विक्रीच्या क्षेत्रात (रिटेल) थेट विदेशी गुंतवणुकीला (एफडीआय) परवानगी देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर अखेर संसदेने शिक्कामोर्तब केले. एफडीआयला विरोध करणारे भारतीय जनता पक्ष. डावे आणि इतर विरोधकांचे या शिक्कामोर्तबनंतर चांगलेच तोंड फुटले असेल. एफडीआय ही काळाची गरज होती. शेतकरीहिताची असलेली ही आर्थिक सुधारणा लागू करण्यासाठी झालेला विरोध राजकीय होता आणि तो नतद्रष्टाही होता, हे आता सर्वांनी लक्षात घ्यायला हवे. एफडीआयच्या मुद्द्यावर संयुक्त पुरोगामी आघाडी (युपीए) सरकारने जनतेत पुरेशी जनजागृती न केल्याने जनतेच्या मनात अनेक शंका-कुशंका आहेत. नेमके याच शंकांचा गैरफायदा राजकीय विरोधक घेत असल्याचे प्रामुख्यान...