वाह रे सरकार तेरा राज,गोदाममे सडा गरिबोंका अनाज!
वाह रे सरकार तेरा राज,गोदाममे सडा गरिबोंका अनाज! पोटभर अन्न मिळत नसल्याने एकीकडे भुखेपोटी कंगाल झालेली लक्षावधी जनता असताना, दुसरीकडे मात्र केवळ सरकारच्या अनास्थेमुळे तब्बल 11 हजार 700 टन धान्य अन्न महामंडळाच्या गोदामात सडत असल्याचे भीषण, भयावह आणि तळपायाची आग मस्तकात घालवणारे वास्तव उघड पडले आहे. विशेष म्हणजे, हे वास्तव केंद्रीय कृषी तथा अन्न पुरवठा मंत्री शरद पवार यांनीच उघडकीस आणल्याने पवारांच्या कार्यकर्तृत्वावरच आता प्रश्नचिन्ह निर्माण होते. या देशात दारिद्रय रेषेखालील नागरिकांची संख्या अजूनही 50 टक्क्यांपेक्षाअधिक आहे. त्यांना दोन वेळचे जेवणही नशीब नाही. देशातील अर्धी लोकसंख्या रोजरात्री उपाशी झोपत असते आणि दरवर्षी हजारो बालके कुपोषणाने बळी जात असतात. तरीदेखील गोदामात हजारो टन धान्य सडते, या सरकारच्या हरामखोरपणाला काय म्हणावे? हे सरकार इतके निर्लज्ज आणि बिनडोक निपजेल असे स्वप्नातही वाटले नव्हते. ज्या अन्न महामंडळाच्या गोदामात हे धान्य सडविण्याचे पाप होते, त्या अधिकार्यांचे महापाप पोटात घालणारे अन्न व पुरवठा खात्याचे मंत्री या सर्वांना या पापास जबाबदार धरून त्यांच्यावर हत्तीच्या ...