मुंडेसाहेबांचा खून पचणार का?
मुंडेसाहेबांचा खून पचणार का? ..... भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते, केंद्रीय मंत्री तथा बहुजन समाजातील लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या घातपाती निधनानंतर कोट्यवधी बहुजन समाज पोरका झाला. समाजाच्या मनात जे खदखदत होते ते ऍण्टी करप्शन कमिटीचे राष्ट्रीय अध्यक्ष रवींद्र द्विवेदी यांनी प्रसारमाध्यमांपुढे आणले. तीनवेळा मृत्युला सहर्ष परत पाठविणारे मुंडेसाहेब चौथ्यांदा अगदीच अलगद मृत्युच्या तावडीत कसे सापडले? हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आला होता. मुंडेसाहेबांचा खूनच झाला असावा अन् हा खून कुणी केला? हेही तमाम बहुजन समाजाला माहित आहे. आता राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने या घातपाताचा तपास करण्याचे आदेश मुंबई व दिल्ली पोलिस आयुक्तांना दिल्यानंतर सत्य काय ते बाहेर येईल? अशी भाबडी आशा आहे. सीबीआयचा संशयास्पद अहवाल, तपासात ठेवण्यात आलेले कच्चेदुवे आदी बाबी पाहाता, हा घातपात पचविण्यासाठी वरिष्ठस्तरावर पुरेपूर तयारी झाली असावी, अशी शंका मनात येते. दुर्देवाची बाब अशी, की ज्यांचे बोट धरून पंकजा, धनंजय अन् प्रितम हे मुंडेभावंड राजकारणात मोठे झाले. अगदी मंत्री, विरोधी पक्षनेते अन् खासदार झालेत, तीच...