गंदा है पर धंदा है!
पूर्वीचे राजकारण समाजकारणाचा वसा होते. आताचे राजकारण धंदेवाईक झाले असून, समाजकारणापासून त्याने फारकत तर घेतलीच शिवाय तत्त्वनिष्ठता, मानवीमूल्ये वैगरे सगळ्याबाबी गळ्यातील जाणवे खुंटीवर लटकावे आणि मटणावर ताव मारावा याप्रमाणे गुंडाळून ठेवली आहेत. सत्या या हिंदी चित्रपटातील नायक म्हणतो त्याप्रमाणे ‘गंदा है पर धंदा है’ असे आजच्या राजकारणाची गत झाली असल्याचे बटबटीत वास्तव नगरच्या जिल्हा परिषदेत पाहावयास मिळाले. फंदफितुरी, दगाफटका या दोन शब्दांचा जीवंत अनुभव मराठ्यांनी नेहमीच घेतला. मराठ्यांचा आजपर्यंतचा इतिहासच या दोन शब्दांभोवती फिरतो. काळ बदलेल, परिस्थितीही बदलेल परंतु इतिहास पुन्हा पुन्हा याच शब्दांची उजळणी करत राहील, असा शापच मराठ्यांना बसला, की काय याची शंका येते. झेडपीच्या राजकारणात काल जे झाले ते बरे नव्हे, एवढेच आम्ही पोटतिडकीने सांगू इच्छितो. अध्यक्षपदासाठी उपेक्षित मराठा असलेल्या विठ्ठलराव लंघेंना संधी मिळाली, याचे समाधान वाटत असले तरी सत्यजित तांबेसारख्या एका युवानेत्याच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे जे काम झाले त्याचे समर्थन करताच येणारे नाही. गळाभेट घेऊन या युवकाच्या पाठीत खुपसल्या ...