पोस्ट्स

नोव्हेंबर, २०११ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पृथ्वी नावाच्या ग्रहावर माणसांची दाटी!

इमेज
जगाच्या लोकसंख्येने सात अब्जाचा आकडा ओलांडला आहे. पृथ्वीसारख्या ग्रहावर एवढ्या माणसांची दाटी झाली असली तरी त्यांच्या भवितव्याचे आणि वर्तमानाचेही काय, या प्रश्‍नाचे उत्तर आता शोधावे लागेल. मानव हा जमिनीवर राहणारा प्राणी असल्याने २९ टक्के भूभागावर त्याचे अस्तित्त्व असेल, त्यातीलही बहुतांश भूभाग बर्फ, वाळू आणि जंगल यांनी व्यापलेल्या असल्याने उर्वरित जमिनीवर अन्न पिकवणे आणि निवास वसविणे यासाठी त्याला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. नैसर्गिक साधनसंपत्तींचा नाश करण्याचे पाप मानव करतच आहे, त्यामुळे पुढील पिढीसाठी काहीही शिल्लक राहणार नाही. परंतु, दाटी केलेल्या माणसांसाठी पृथ्वीवर पुरेसे अन्नही पिकेल का नाही, ही शंका आहे. सात अब्जावे बाळ भारतात जन्माला आले, त्याचा फार मोठा उदोउदो झाला. परंतु, या बाळाचे पुढचे भवितव्य काय, या प्रश्‍नाचे उत्तर केंद्र सरकारकडे आहे का, किंवा संयुक्त राष्ट्रे (यूएन) तरी या प्रश्‍नाचे समाधानकारक उत्तर देईल का? पृथ्वीवर लोकसंख्या वाढीने दाटी झाली असून, उद्या या दाटीत सर्वांचाच जीव गुदमरणार आहे, ही दाटी कमी करण्यासाठी आजच पुढाकार घ्यावा लागेल! .... पृथ्वीवर साधने मर्या...