राजकारण : पैसा वसुली धंदा !
....
राजकारण हे पैसा वसुली धंदा झाले आहे. राजकारणात उतरले की श्रीमंती येते कशी? याचे अप्रूप अनेकांना वाटत असते. परंतु, राजकीय नेत्यांकडे आलेली श्रीमंती म्हणजे आपल्याच खिशाची झालेली लूट असते, हे किती लोकांच्या लक्षात येते. राजकारणी मंडळी मोठ्या अभिमानाने त्यांची संपत्ती जाहीर करत असतात. परंतु, त्यांची ही संपत्ती म्हणजे जनतेचीच लूट आहे, हे जोपर्यंत लोकांच्या लक्षात येणार नाही, तोपर्यंत त्यांच्या संपत्तीचे आकडे दरपाच वर्षाला दुप्पटीने होण्याचे सत्र थांबणार नाही.
......
अलिकडे राजकारण हा झटपट श्रीमंत होण्याचा मार्ग ठरले आहे. ज्या लोकांकडे एकेकाळी फुटकी कवडी नव्हती अशी माणसे राजकारण कोट्यधीश झालेली दिसतात. हा चमत्कार होतो कसा? याचे उत्तर शोधता सापडत नाही. परंतु, राजकारण हे सभ्य लोकांचे क्षेत्र राहिले नाही, असे जे म्हटले जाते त्यातच या राजकारणातील गौडबंगालाचे उत्तर दडलेले असावे. दोन नावे प्रामुख्याने अशी समोर येतात, की कधीकाळी ही व्यक्तिमत्वे फार हलाखीचे, गरिबीचे जीवन जगत होती. परंतु, आता त्यांच्याकडे गडगंज संपत्ती आहे. ही नावे प्रातनिधीक स्वरुपाची असली तरी गल्लीबोळातील नेता झाला तरी या नेत्याकडे येणारी समृद्धी कोणत्या मार्गाने येते हे खोलात जावून सांगण्याची गरज नसावी. अलिकडे चर्चेत आलेले पहिले नाव आहे ते उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांचे. या बाईने २००७ मध्ये जेव्हा विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज भरला होता. तेव्हा त्यांच्याकडे असलेली संपत्ती ही ५२ कोटी रुपये एवढी असल्याचे जाहीर केले होते. आता काही दिवसांपूर्वी जेव्हा त्यांनी राज्यसभेकरिता उमेदवारी अर्ज दाखल केला तेव्हा हीच संपत्ती १११.६४ कोटी रुपये झाल्याचे त्यांनी जाहीर केले. मायावती यांची संपत्ती अवघ्या पाच वर्षात दुप्पट होते, असा त्यांचा धंदा, उद्योग तरी कोणता हे एकदा त्यांनी जगाला सांगावेच. मुख्यमंत्रिपदाच्या काळात ही संपत्ती मायावती यांनी कोणत्या माध्यमातून कमाविली हे न समजण्याइतपत जनता नक्कीच दुधखुळी नाही. परंतु, ही स्वमेहनतीची संपत्ती आहे, की जनतेची केलेली लूट आहे, याचे उत्तर कुणी मागायचे आणि मायावती ते देतील का? हा खडा सवाल आहे. मायावती या स्वतःला दलित की बेटी असे म्हणतात. तर त्यांचे राजकीय विरोधक त्यांना दौलत की बेटी असे संबोधतात. दलितांची ही महिला नेत्या फार कमी काळात अतिश्रीमंत झाली, हे खरे असले तरी तिचा भूतकाळ तपासल्यास या श्रीमंतीचा उगम फारसा नसल्याचे जाणवते. ज्या बहुजन नेते कांशिराम यांनी मायावतींना राजकारण शिकविले, त्याच कांशिरामाचा पक्ष मायावतींनी ताब्यात घेतला. कांशिरामांच्या तत्वांना हरताळ फासण्याचे कामही त्यांनी केल्याची बहुजन चळवळीत चर्चा झडत असते. कांशिराम यांनी सचोटीचे, तत्वाचे आणि मूल्यांचे राजकारण केले. असले राजकारण करत असताना त्यांनी कधीही संपत्ती गोळा करण्याचे काम केले नाही. त्यामुळेच कांशिराम हे गेले असले तरी त्यांचे विचार अद्यापही जीवंत आहेत, आणि हेच विचार विकून मायावती त्यांची संपत्ती वाढवित आहेत. राजकारणाद्वारे गलगंड संपत्ती जमविणारा दुसरा एक चेहरा समोर येतो तो, कॉंग्रेसचे नेते कृपाशंकर सिंह यांचा. कृपाशंकर सिंह या उत्तर प्रदेशी माणसाने मुंबईत प्रवेश केला तेव्हा त्याच्या अंगावर पुरेसे कपडेही नव्हते. परंतु, काही महिन्यांपूर्वी जेव्हा कृपाशंकरवर राजकीय वक्रदृष्टी स्थिरावली तेव्हा त्यांनी कोट्यवधी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जमविल्याचे उघड झाले. बर ही मालमत्ता तरी किती असावी, तब्बल ३५० कोटी रुपयांची. एकेकाळी कॉंग्रेसच्या कार्यालयात साफसफाईचे काम करणारा हा माणूस एवढी संपत्ती जमवितोच कशी, त्याचेही उद्योगधंदे काय आहेत? याचे उत्तर पोलिसी तपासात पुढे येईल, असे वाटले होते. परंतु, अद्याप तरी ते आले नाही. राजकारणातूच गलगंड पैसा कमाविता येतो हे खरे आहे. काल - परवा अगदी गल्लीबोळात पुढारीपण करणारे जेव्हा सदस्य म्हणून गावातल्या ग्रामपंचायतीत बसतात, तेव्हा त्यांच्याकडे अचानक समृद्धी नांदायला सुरुवात होते. काही लाखांचा मालक असणारा राजकारणी जेव्हा आमदार होतो तेव्हा त्याच्याकडे काही वर्षातच कोट्यवधीची संपत्ती येते. राजकारण हा एक असा परिस ठरत आहे, ज्याचा स्पर्ष झाला की माणसाकडे खोर्याने पैसा येतो. परंतु, हा पैसा असतो कुणाचा याचे उत्तर फार लवकर मिळत नाही. जेव्हा मिळते तेव्हा आपलाच खिसा मारला गेला, की काय असे वाटायला लागते. किती तरी राजकारणी माणसांची नावे देता येतील, जे एकेकाळी भिकारी होते परंतु, आता कोट्यधीश झाले आहेत. याला काही नावे अपवादही आहेत. त्यात प्रामुख्याने शरद पवार व ए. के. ऍण्टोनी यांची नावे घ्यावी लागतील. गेल्या पाच ते सहा दशकांपासून राजकारणात असलेले शरद पवार यांच्याकडे अब्जावधी रुपये असल्याचे बोलले जाते. ते खरे किती अन् खोटे किती हे त्यांच्याबाबत वावड्या उठविणाराच सांगू शकतो. परंतु, अलिकडे जेव्हा त्यांनी लोकसभेची निवडणूक लढविली तेव्हा त्यांच्या मालमत्तेचा जमीन, जुमल्यांसह सर्व तपशील भरला गेला आणि ही मालमत्ता निघाली केवळ ८.७३ कोटी रुपये. ही आकडेवारी खोटी आहे, असा आरोप कुणीही करु शकतो. परंतु, हा आरोप सिद्ध करुन दाखव असे आव्हान त्याला दिले तर हे आव्हान स्विकारणारा कुणीही पुढे येणार नाही. पवार हे मोठे नेते असल्याने त्यांचे विरोधकही फार असू शकतात. या सर्व विरोधकांनी पवारांच्या संपत्तीबाबत यापूर्वी आरोप केले आहेत. परंतु, त्यांनादेखील कोणताही आरोप सिद्ध करता आला नाही. मुळात काय तर आडात नसेल तर पोहर्यात तरी येईल कसे? राजकारण हा पैसा कमाविण्याचा सोपा धंदा झाला आहे, हे खरे आहे. पवारांसारखे त्याला अपवादही असेल. परंतु, अशी माणसे बोटाच्या कांड्यावर मोजता येईल एवढीच निघतील. बाकी इतर राजकारणी मात्र लोकांच्या माना मोडून आपली घरे भरणारीच आहेत. मायावती असोत किंवा कृपाशंकर या माणसांकडे असलेली गलगंड संपत्ती ही आपल्या खिशाचीच झालेली लूट म्हणावी लागेल.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा