पोस्ट्स

मार्च, २०१७ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
इमेज
अशक्तपणा असला तरी प्रकृती ठीक पूज्यनीय शुकदास महाराजांना औरंगाबादेतील सेठ नंदलाल धूत रुग्णालयात दाखल केल्यानंतर राज्यभरासह देशभरातून त्यांच्या प्रकृतीची विचारणा होत असून, विवेकानंद आश्रम सचिवालयासह आश्रम पदाधिकार्‍यांचे दूरध्वनी सातत्याने खणखणत आहेत. तसेच धूत रुग्णालयातही मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. त्यामुळे महाराजांच्या प्रकृतीची माहिती देणारा व्हिडिओ संदेशच हृदयरोगतज्ज्ञ डॉ. विलास मगरकर यांनी जारी केला. या व्हिडिओत पूज्यनीय महाराज कमालीचे अशक्त दिसत असले तरी वैद्यकीयदृष्ट्या त्यांच्या प्रकृतीत सुधारणा जाणवत आहे. महाराजांचे हृदय, मूत्रपिंड आता ठिकठाक काम करत असून, त्यांची कृत्रिम श्‍वसन प्रणाली काढण्यात आलेली आहे. तसेच, दिवसातून दोनवेळा डायलेसिस करावे लागत आहे. तथापि, रक्तदाब व हृदयाचे ठोके नियमित असल्याचेही डॉ. मगरकर यांनी सांगितले. 
इमेज
हे कसले गांधी हो! फोकस/ पुरुषोत्तम सांगळे निवासी संपादक, जनशक्ती, पुणे थोरगांधीवादी म्हणून ज्यांना ओळखले जाते त्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पुन्हा शरद पवार यांच्याविरुद्ध आघाडी उघडली आहे. अख्खा देश जातीवाद, नोटाबंदी आणि इतर समस्यांनी ग्रस्त असताना अण्णांनी त्याकडे कानाडोळा करून पवारविरोधाचे शस्त्र उपसलेे. गांधीवादात व्यक्तीद्वेषाला स्थान नाही, तरीही अण्णा हे वारंवार पवारांचा द्वेष करतात, त्यामुळे अण्णा हे कसले गांधी? असा प्रश्‍न पडतो. सहकारी साखर कारखानदारीत पवारांनी 25 हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप अण्णांनी केला आहे. त्यासाठी त्यांनी उच्च न्यायालयाचे दारही ठोठावले आहे. त्याबद्दल न्यायालयाने अण्णांना फटकारले असले तरी त्यांच्या या कृतीतून केवळ अन् केवळ पवारद्वेष तेवढा दिसतो. शिवाय, नागपुरातील रेशीमबागेत बसलेला त्यांचा बोलविता धनीही उघड होतो! ------ जेथे शरद पवार यांना विरोधाचा प्रश्‍न येतो, तेथे अण्णा हजारे हे कधी कधी आपण देशवासीयांनी गौरवलेले ‘प्रतिगांधी’ आहोत हेच विसरून जातात. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या मनात कोणत्याही व्यक्तीबद्दल कधीच द्वेष नव्हता. परंतु, आ...
इमेज
नरेंद्र मोदीजी, गांधींच्या वाटेला जाऊ नका! फोकस/ पुरुषोत्तम सांगळे, निवासी संपादक, दैनिक जनशक्ति, पुणे 8087861982 खादी ग्रामोद्योग मंडळाच्या डायरी अन् कॅलेंडरवरून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना हटवून त्यांची जागा घेण्याचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. त्याबद्दल देशभर मोदी यांची निंदा सुरुच आहे. मोदी हे रा. स्व. संघाचे प्रॉडक्ट आहे, अन् गांधींना संपविण्यासाठी संघाने काय प्रयत्न केलेत ते जगजाहीर आहे. इतक्या वर्षांत गांधींना संपविण्यास त्यांना अजिबात यश आले नाही. उलटपक्षी गांधी प्रत्येकाच्या हृदयात आढळस्थान प्राप्त करून बसले. गांधी नि:शस्त्र आहेत, अहिंसक आहेत, परंतु त्यांनी बलाढ्य अशी इंग्रजी सत्ता हाती शस्त्रही न घेता उलथावून टाकली होती. हे नरेंद्र मोदी यांनी लक्षात ठेवावे. गांधींच्या वाट्याला जाऊ नका, ते तुम्हाला परवडणारे नाही, हेच या निमित्ताने मोदी यांना सूचवावेसे वाटते! -- माणूस स्वतःच्याच प्रेमात किती वेडं होऊ शकतो, याचे जीवंत उदाहरण पहायचे असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पहा! या माणसाने चक्क राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना हटवून त्यांच्या जागी ...
इमेज
रा. स्व. संघाला आरक्षणाची पोटदुखी का? फोकस/ पुरुषोत्तम सांगळे निवासी संपादक, जनशक्ति, पुणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आरक्षणाला नेहमीच विरोध राहात आला आहे. वेळोवेळी त्यांनी आपला हा विरोध प्रगट केला अन् त्याची राजकीय किंमत त्यांचे राजकीय अपत्य असलेल्या भाजपने चुकवली. खरे तर आरक्षण म्हणजे प्रतिनिधीत्व असते. उपेक्षित घटकांना प्रतिनिधीत्व मिळावे आणि या घटकांची सर्वांगीण प्रगती व्हावी, हीच आरक्षणामागची घटनाकारांची भूमिका होती. मागासवर्गीय जाती पुढे गेल्या तर आपले काय? असा संघाला फोबिया झाला आहे. त्यातूनच ते आरक्षण समीक्षेची म्हणजेच आरक्षण विरोधाची भाषा करत आहेत. ----- आरक्षणामुळे फुटीरतावाद वाढू शकतो. त्यामुळे एका ठराविक वेळेनंतर जातीवर आधारित आरक्षणाचे समूळ उच्चाटन केले पाहिजे, असे वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते मनमोहन वैद्य यांनी करून पाच राज्यांतील निवडणुकीच्या तोंडावर वादाला तोंड फोडले. अशाच एका वक्तव्यामुळे भारतीय जनता पक्ष या संघाच्या अपत्य राजकीय पक्षाला बिहार हे मोठे राज्य गमवावे लागले होते. बिहारच्या निवडणुकीत चांगले वातावरण असतानाही सरसंघचालकांनी आरक्षणविरोधी भूमिका...
इमेज
.. आता धनंजय मुंडेंचे खच्चीकरण का? फोकस/ पुरुषोत्तम सांगळे निवासी संपादक, दैनिक जनशक्ति, पुणे 8087861982 ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्व. गोपीनाथ मुंडेसाहेबांच्या जन्मतारखेचा वाद उकरून काढत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राजकारण ढवळले आहे. त्यांच्या पक्षात सद्या धनंजय मुंडे यांचे नेतृत्व बहारण्याचा काळ सुरु आहे. ‘फायर ब्रॅण्ड‘ नेता म्हणून धनंजय यांचे नाव राज्याच्या कानाकोपर्‍यात पोहोचले आहे. परंतु, आपल्याच पक्षाच्या मोठे होणार्‍या नेत्याचे खच्चीकरण करायचे ही सवय काही अजितदादांची जात नाही. जन्मतारखेच्या वादात हेतुपुरस्सर धनंजय यांचे नाव गोवून आपला हेतू अजितदादांनी साधला आहे.  -- आपली वाचाळवीरता सोडायला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. अजितदादा पवार हे काही तयार नाहीत, असे एकूण दिसते. राजकारणातील ‘सार्वजनिक काका’ व ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दीर्घकाळ राजकारणात काम करताना साधनसुचिता बाळगली, काही पथ्ये पाळली अगदी कपटी राजकारण करतानाही त्यांनी मर्यादा ओलांडली नाही. कुणाविषयी कटू बोलणे तर सोडाच कुणाला चिमटा काढतानाही त्यांनी आपली उंची आणि श...
इमेज
गाजरं वाटा गाजरं! फोकस/ पुरुषोत्तम सांगळे निवासी संपादक, जनशक्ति, पुणे महापालिका निवडणुकीची रणधुमाळी आता संपली आहे. ही निवडणूक शिवसेनेसाठी जशी अस्तित्वाचा प्रश्‍न होती; तशीच ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राजकीय भवितव्य ठरविणारीदेखील आहे. संपूर्ण निवडणुकीचा आढावा घेतला तर भाजपचे स्टार प्रचारक राहिलेले फडणवीस यांनी जेथे सभा घेतली तेथे नुसती आश्‍वासनांची गाजरे वाटली. लोकांना धक्कादायक अशी त्यांची आक्रास्ताळेल भाषणे होती. या निवडणुकीचा निकाल काय हाती यायचा तो येईलच; परंतु लोकांनी मात्र आजच निकाल लावून टाकलेला आहे. मुख्यमंत्र्यांच्या राजकीय भवितव्यावर फार मोठा परिणाम करणारा हा निकाल असेल. मुख्यमंत्र्यांनी लोकांना वाटलेली गाजरे त्यांना साभार परत करण्याची मानसिकता मतदारांनी केलेली दिसते. ते निश्‍चितच फडणवीस यांच्यासाठी चांगले नाही! -- भारतीय जनता पक्षाच्या सरकारला व खास करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विरोधकांनी गाजरं वाटणारे सरकार, अशी उपमा दिली आहे. हे सरकार थापाडे आहे, नुसत्या थापा मारते, अशी जोरदार टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर झाली. झालेली ट...
इमेज
पवारांच्या राजकारणाला फडणवीसांचे वेसन! फोकस/ पुरुषोत्तम सांगळे शरद पवार म्हणजे महाराष्ट्रातील कमालीचे धूर्त अन् मातब्बर नेते. परंतु, पवारांकडूनही काही राजकीय चुका झाल्यात. स्व. गोपीनाथ मुंडे यांना ‘अंडर एस्टीमेट‘ करून पवारांनी राजकारणात मात खाल्ली होती. तशीच मात आता ते ‘कालचा बच्चा‘ समजून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून खात आहेत. पवारांच्या जातीय समीकरणाला फडणवीसांनी जातीय समीकरणांनीच प्रत्युत्तर दिले. फडणवीसांची प्रत्येक राजकीय खेळी ही पवारांच्या राज्यातील राजकारणाला चांगलेच वेसन घालणारी ठरत असल्याने, पवारांना सांगताही येईना अन् सहनही होईना, असे झाले असेल! -------------------- देशाच्या राजकारणात आपल्या चाणाक्ष अन् धूर्त राजकारणामुळे ओळखले जाणारे; परंतु पंतप्रधानपदाचा घास हाता-तोंडाशी येऊनही तोंडात न जाऊ शकलेले नेते म्हणजे शरद पवार होय! देशाचे सर्वोच्चपद भूषविण्यात पवार कमनशिबी ठरले असले तरी, राज्यात मात्र त्यांची राजकीय पकड मजबूत होती आणि आहे. किंबहुना सर्वच राजकीय पक्ष पवारच चालवितात, असे जे गमतीने म्हटले जाते, ते खरेही आहे. अशा शरद पवार यांच्याकडूनही काही राजकीय चुका ह...
इमेज
खडसेंनंतर आता पंकजा मुंडे का? - फोकस/ पुरुषोत्तम सांगळे स्व. गोपीनाथ मुंडे यांचा संघर्षाचा राजकीय वारसा लाभलेल्या पंकजा मुंडे-पालवे यांना राजकीयदृष्ट्या संपविण्यासाठी मुंबई व नागपुरात सद्या कुटील डावपेच आखले जात आहेत. कारण, त्यांच्या समर्थकांनी मुख्यमंत्र्यांचे जाळलेले पुतळे कदाचित नागपुरी चाणक्यांना आवडलेले नसावेत. परंतु, ज्यांच्यामागे स्वतःचा मतदार नाही, त्या लोकांनी पंकजांबाबत आरोपांची ‘मीडिया ट्रायल’ सुरु करण्यापूर्वी दहावेळा विचार करायला हवा; कारण एकनाथ खडसेंचे झाले ते पंकजांबाबत बहुजन समाज कदापिही सहन करणार नाही! -------- प्रचंड जनाधार आणि स्वतःचा मतदारसंघ असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्या व राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे-पालवे यांना लक्ष्य करण्याचे काम सुरु आहे. पंकजांचेही खडसे करावेत, अशी राजकीय खेळी पक्षातूनच खेळली जात असल्याचे प्राथमिक चित्र दिसतेे. विलासराव देशमुख यांच्याजागी अशोक चव्हाण यांची मुख्यमंत्रिपदी निवड झाल्यानंतर संतप्त झालेल्या नारायण राणे यांनी काँग्रेस नेतृत्वावर तोफ डागली होती. पक्षाचे नेते राहुल गांधी, सोनियांचे विश्‍वासू आणि राजकीय सल्लाग...