पोस्ट्स

आजची सामाजिक अस्वस्थता हाच पुरोगामित्वाचा खरा पराभव!

इमेज
आजची सामाजिक अस्वस्थता हाच पुरोगामित्वाचा खरा पराभव! फोकस/ पुरुषोत्तम सांगळे, निवासी संपादक, जनशक्ति, पुणे भारतात सद्या मुस्लीम समाज अत्यवस्थ आहे, तद्वतच दलित आणि ओबीसीवर्गही अत्यवस्थ आहे. पुरोगामी विचारांचा पराभव म्हणजे सद्या सुरु असलेले मोदीयुग म्हणावे लागेल. गांधींच्या विचारांची दररोज होणारी हत्या या देशाला कलंकित करते. संविधानाचे संरक्षण करायचे असेल तर स्वातंत्र्य, समता, बंधुता या विचारांना मानणारा देशातील प्रत्येक व्यक्ती आता एकत्र यायला हवा. मोदीयुग या देशाला अशा दिशेला घेऊन जात आहे, ज्या दिशेला एकेकाळी फ्युरर हिटलर गेला होता. देशाचा अंधकाराकडे जाणारा हा प्रवास आता प्रत्येकाला विवेकबुद्धीने थांबवावाच लागणार आहे! -- भारतातील एक मोठा वर्ग सद्या अत्यवस्थ आहे. त्यांची अत्यवस्थता समजून घेण्यासारखी आहे. गोरक्षणाच्या नावाखाली होत असलेल्या हत्या हा तो चिंतेचा विषय असून, या हत्या रोखण्यात यश आले नाही तर या देशाची वाटचाल अराजकतेकडे जाणारी ठरेल. संविधान आणि त्यातून प्रदान करण्यात आलेले स्वातंत्र्य, समता व बंधुता तसेच समान नागरी अधिकाराचा धर्माच्या नावाखाली संकोच करण्याच्या घटना अलिकडे मोठ्य...

अभिव्यक्ती म्हणजे, सर्वोच्च न्यायालयाची बेअदबी का?

इमेज
फोकस/ पुरुषोत्तम सांगळे मराठी उद्योगपती अन्वय नाईक यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्हेगारी खटल्यातील आरोपी तथा रिपब्लिकन वृत्तवाहिनीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना सर्वोच्च न्यायालयात अगदीच तडकाफडकी अंतरिम जामीन मिळाला. बरे हा जामीन मिळाल्यानंतर हे संपादक महोदय वठणीवर येतील असे वाटले होते. परंतु, त्यांनी ज्या पद्धतीने बिभत्स प्रदर्शन घडविले; ते पाहाता, हे महाशय कायदा खिशात घालूनच फिरतात की काय? असा प्रश्‍न मनात निर्माण झाला. मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व महाराष्ट्र सरकार यांना खुले आव्हान देण्याची भाषा अर्णव यांनी केली. इतका माज येतो कसा? अन्वय नाईक यांनी आत्महत्या करण्यापूर्वी जी चिठ्ठी लिहिली होती, तीत अर्णव गोस्वामी यांचे स्पष्टपणे नाव आहे; तरीही देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या सत्ताकाळात अर्णव गोस्वामी यांना क्लीनचिट देण्याचे पाप केले होते. आता नाईक आत्महत्येच्या प्रकरणात अर्णव यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर कायदा त्यांच्या पद्धतीने काम करत असताना, त्याला राजकीय वळण देण्याचा घाणेरडा प्रकार भाजपने करून अर्णवला वाचविण्याचा प्रयत्न चालवला आहे. भाजप एका पत्र...
इमेज
आता पवारविरुद्ध मुंडे नाही;  मुंडेविरुद्ध मुंडेच झुंजणार! फोकस/ पुरुषोत्तम सांगळे निवासी संपादक, दैनिक जनशक्ति, पुणे धनंजय मुंडे मुख्यमंत्री होत असतील तर राज्यातील 60 लाखांपेक्षाअधिक वंजारी समाजाची ताकद राष्ट्रवादीच्या पाठिशी उभी राहील. गरज फक्त तशा प्रकारची अधिकृत घोषणा शरद पवारांनी करावी. केवळ वंजारीच नव्हे तर बहुजन समाजातील अनेक छोटे-मोठे जातसमूहदेखील राष्ट्रवादीला कौल देतील. पवारांच्या भूमिकेनंतर आगामी निवडणुकीत राज्यातील राजकीय वातावरण बदलेले दिसेल. पवारांसारख्या चाणाक्ष नेत्याला या बदललेल्या मानसिकेताचा सुगावा लागला नसेल असे नाही. कदाचित पवार एखाद्या योग्य संधीची वाट पाहात असतील. स्व. गोपीनाथ मुंडे यांचे अपूर्ण स्वप्न साकार करण्याचे मोठे आव्हान धनंजय मुंडे यांच्यासमोर आहेच; तद्वतच ते समाजासमोरदेखील आहे. त्यामुळे कधीकाळी राज्याच्या राजकारणात रंगलेला पवारविरुद्ध मुंडे हा सामना आता संपला असून, मुंडेविरुद्ध मुंडे- पालवे असाच सामना रंगणार असल्याचे आगामी काळ संकेत देत आहे.  -- सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे एका राज्यस्तरीय मेळाव्यात विधानपरिषदेचे विरोधी पक...
इमेज
आजची सामाजिक अस्वस्थता हाच पुरोगामित्वाचा खरा पराभव! फोकस/ पुरुषोत्तम सांगळे, निवासी संपादक, जनशक्ति, पुणे भारतात सद्या मुस्लीम समाज अत्यवस्थ आहे, तद्वतच दलित आणि ओबीसीवर्गही अत्यवस्थ आहे. पुरोगामी विचारांचा पराभव म्हणजे सद्या सुरु असलेले मोदीयुग म्हणावे लागेल. गांधींच्या विचारांची दररोज होणारी हत्या या देशाला कलंकित करते. संविधानाचे संरक्षण करायचे असेल तर स्वातंत्र्य, समता, बंधुता या विचारांना मानणारा देशातील प्रत्येक व्यक्ती आता एकत्र यायला हवा. मोदीयुग या देशाला अशा दिशेला घेऊन जात आहे, ज्या दिशेला एकेकाळी फ्युरर हिटलर गेला होता. देशाचा अंधकाराकडे जाणारा हा प्रवास आता प्रत्येकाला विवेकबुद्धीने थांबवावाच लागणार आहे! -- भारतातील एक मोठा वर्ग सद्या अत्यवस्थ आहे. त्यांची अत्यवस्थता समजून घेण्यासारखी आहे. गोरक्षणाच्या नावाखाली होत असलेल्या हत्या हा तो चिंतेचा विषय असून, या हत्या रोखण्यात यश आले नाही तर या देशाची वाटचाल अराजकतेकडे जाणारी ठरेल. संविधान आणि त्यातून प्रदान करण्यात आलेले स्वातंत्र्य, समता व बंधुता तसेच समान नागरी अधिकाराचा धर्माच्या नावाखाली संकोच करण्याच्...
काय नासवत आहात? स्वप्ने!! फोकस/ पुरुषोत्तम सांगळे, निवासी संपादक, दैनिक जनशक्ति, पुणे आवृत्ती -- अनेक निरर्थक मुद्द्यांवर जेव्हा या देशात मोठे आकंडतांडव सुरु असते; तेव्हा समजून घेतले जावे की, सत्ताधारीवर्गाने एखाद्या महत्वाच्या मुद्द्यावरून जनतेचे लक्ष वळविण्याचा प्रयत्न चालविलेला आहे. एकीकडे भारताला विश्वगुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, अशा राणाभीमदेवी गर्जना करायच्या आणि दुसरीकडे, शिक्षणक्षेत्राचे पार वाटोळे करून सोडायचे, असा दुटप्पीपणा सरकारने चालविलेला आहे. आजचे शिक्षण गरिबांच्या आवाक्याबाहेर गेले असून, गरिबांची मुले शिक्षणाच्या प्रवाहातून कशी बाहेर पडतील, असे मोठे षडयंत्र या देशात शिजते आहे. सामाजिक व्यवस्थेत अगदी तळात असलेले समाजघटक जेव्हा शिक्षणामुळे प्रस्थापितांच्या बरोबरीला आलेत, त्या शिक्षणाच्या मुळावरच घाव घालण्याचे हे षडयंत्र आहे. ते कुणाच्या लक्षात आले नाही, असे प्रस्थापितांना आणि त्यांच्या हातचे कळसूत्री बाहुले ठरलेल्या सरकार नावाच्या यंत्रणेला वाटते; परंतु हे षडयंत्र आता सर्वांच्या लक्षात आले आहे, याची जाणिव या वर्गाने ठेवावी. हे सरकार काय नासवत आहे? य...
इमेज
बाबा गुरुमीतचा हिंसाचार हा देशद्रोहच! फोकस/ पुरुषोत्तम सांगळे निवासी संपादक, दैनिक जनशक्ति, पुणे डेरा सच्चा सौदा आश्रमाचा प्रमुख बाबा गुरुमीत रामरहीम सिंग याच्या अटकेवरून सद्या पाच राज्ये पेटली आहेत. या राज्यांतील हिंसाचारात अनेक बळी गेलेत, कोट्यवधींच्या मालमत्तेचे नुकसान झाले. हे नुकसान न्यायालय गुरुमीत व डेरा सच्चा सौदाच्या संपत्तीतून भरून काढेलच; परंतु जे बळी गेलेत त्यांचे काय? मुळात गुरुमीतसारख्या बाबाची कायदा अन् व्यवस्थेलाच आव्हान देण्याची हिंमत होतेच कशी? स्वतःला अवतारी पुरुष म्हणून घेणार्‍या या बाबाला स्त्रियांचे लैंगिक शोषण करण्याची परवानगी मिळालेली आहे काय? या बाबा आणि त्याच्या अनुयायांचे बंड हे सरळ सरळ देशद्रोह आहे. त्यांनी हिंसाचार माजवून देशद्रोह चालविला आहे. तेव्हा, त्यांना सरळ गोळ्या घालणे आणि त्यांचे देशद्रोही बंड मोडून काढण्याचे काम सरकारने करावे.  --------------------- दोन तरुण साध्वींचे लैंगिक शोषण करणारा, त्यांच्यावर धर्माचा बुरखा पांघरून अनन्वित अत्याचार करणारा सिरसा येथील डेरा सच्चा सौदा या आश्रमाचा प्रमुख गुरुमीत रामरहीम सिंग याला विशेष सी...
इमेज
अशक्तपणा असला तरी प्रकृती ठीक पूज्यनीय शुकदास महाराजांना औरंगाबादेतील सेठ नंदलाल धूत रुग्णालयात दाखल केल्यानंतर राज्यभरासह देशभरातून त्यांच्या प्रकृतीची विचारणा होत असून, विवेकानंद आश्रम सचिवालयासह आश्रम पदाधिकार्‍यांचे दूरध्वनी सातत्याने खणखणत आहेत. तसेच धूत रुग्णालयातही मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. त्यामुळे महाराजांच्या प्रकृतीची माहिती देणारा व्हिडिओ संदेशच हृदयरोगतज्ज्ञ डॉ. विलास मगरकर यांनी जारी केला. या व्हिडिओत पूज्यनीय महाराज कमालीचे अशक्त दिसत असले तरी वैद्यकीयदृष्ट्या त्यांच्या प्रकृतीत सुधारणा जाणवत आहे. महाराजांचे हृदय, मूत्रपिंड आता ठिकठाक काम करत असून, त्यांची कृत्रिम श्‍वसन प्रणाली काढण्यात आलेली आहे. तसेच, दिवसातून दोनवेळा डायलेसिस करावे लागत आहे. तथापि, रक्तदाब व हृदयाचे ठोके नियमित असल्याचेही डॉ. मगरकर यांनी सांगितले.