पोस्ट्स

ऑगस्ट, २०१२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
इमेज
राजधर्म ते फासी! .... गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी आठवडाभरापूर्वी एक वक्तव्य केले होते. गुजरात दंगलीप्रकरणी मी दोषी असेल तर फाशी द्या. गुजरात दंगल ही देशाला लागलेला कलंक आहे. या दंगलीत १२०० निर्दोष नागरिकांची कत्तल केली गेली. या दंगलीत मोदींची भूमिका काय होती, हे अख्खा देश जाणून आहे. मोदींच्या तत्कालीन भूमिकेवर सडेतोड टीका करताना माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी मोदींना राजधर्म निभावण्याचा सल्ला दिला होता. मोदींनी राजधर्म निभावला असता तर ते आज राजकीय जीवनात अस्पृश्य ठरले नसते. या दंगलीची निरपेक्ष चौकशी झालीच नाही. अन्यथा, मोदींना फाशी ठोठावण्याचे काम आजपर्यंत देशातील न्यायसंस्थेनेच केले असते. इतिहास दोन क्रूरकर्म्यांना कधीही क्षमा करु शकत नाही. एक म्हणजे फ्युरर हिटलर तर दुसरे आपले नरेंद्र मोदी! ...... भारताच्या फाळणीनंतर पाकिस्तान या मुस्लीम राष्ट्राची निर्मिती झाली. धर्माच्या नावावर जन्माला आलेल्या राष्ट्राचे काय हाल होतात याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणून पाककडे पाहिले जाते. तथापि, या फाळणीच्यावेळी जो रक्तपात झाला, तो भारतीय माणूस विसरु शकत नाही. फाळणी ही या देशाची भळभ...