एफडीआय : शेतकरी हिताकडे पाठ !
... हिवाळी अधिवेशनाचे लवकरच सूप वाजणार आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या किरकोळ विक्रीच्या क्षेत्रात (रिटेल) थेट विदेशी गुंतवणुकीच्या निर्णयाला या अधिवेशन काळात विरोधकांकडून हरताळ फासला गेला, ही या अधिवेशनातील अत्यंत वाईट उपलब्धी म्हणावी लागेल. चिमुटभर लोकांच्या दबावाखाली एफडीआयला विरोध करणारे विरोधक आणि विरोधकांच्या दबावाला काही राजकीय इप्सित साध्य करण्यासाठी बळी पडलेले केंद्र सरकार हे दोघेही शेतकर्यांसाठीच्या महत्त्वपूर्ण निर्णयावर समाजद्रोह करून बसले आहेत. सध्या हा निर्णय केंद्र सरकारने बासनात गुंडाळला असला तरी तो लागू होईल किंवा नाही, याबाबत काहीही शाश्वती उरलेली नाही. कोणताही विदेशी गुंतवणूकदार आपल्या देशात गुंतवणूक करत असेल तर तो नफा कमावणारच, आणि हा नफा अखेर विदेशात जाणारच असा एक मतप्रवाह काही अतिशहाण्या मंडळींनी निर्माण केला होता. परंतु, या मतप्रवाहाला चोख प्रत्युत्तर देण्याचे तथाकथीत अर्थतज्ज्ञांनी टाळले. गुंतवणूकदार नफा मिळवतात यात काहीही दुमत नसले तरी परंपरागतरीत्या उपेक्षित असलेल्या एका क्षेत्राला या गुंतवणुकीमुळे नवसंजीवनी मिळते याकडे मात्र हेतुपुरस्सर कानाडोळा करण्यात आला. ...