या विषमतेतून क्रांती पेटेल!
रतन टाटा हे केवळ उद्योगपती नाहीत. तर भारताचे द्रष्टे शिल्पकार आहेत. मुकेश अंबानींच्या आलिशान राहणीमानावर त्यांनी नुकतेच प्रखड भाष्य केले होते. अब्जावधी रुपये खर्च करून अंबानी यांनी बांधलेल्या ऍण्टिलिया या महालात वीज, पाणी यांची उधळपट्टीतर होतेच. शिवाय, २७ मजली या आलिशान महालात अंबानी कुटुंब एकटे राहते. अंबानी यांनी असे आलिशान जीवन जगताना आजुबाजूचे दारिद्रयही पाहावे, अशी सूचना टाटा यांनी केली होती. टाटा हे स्वतः अब्जाधीश आहेत. परंतु, एका छोट्या घरात राहतात, तसेच साधे जीवन जगतात. मात्र, त्यांनी उद्योगातून कमाविलेला कोट्यवधींचा पैसा देशातील गोरगरीब जनतेच्या कल्याणासाठी खर्च केला आहे. अंबानी आणि टाटा ही या देशाची दोन टोके मानली तर टाटा यांच्याबद्दल देशवासीयांना जेवढा आदर आहे, तेवढाच तिरस्कार आता अंबानींबद्दल निर्माण झाला आहे. अंबानींच्या आलिशान राहणीमानातून विषमतेचा रोग पसरत चालला असून, या रोगातूनच उद्या क्रांतीच्या ज्वाला पेटतील, या ज्वालांत अंबानींचा आलिशान ऍण्टिलिया जळून खाक होण्यास फार वेळ लागणार नाही. अशी क्रांती यापूर्वी रशिया, चीनने अनुभवली आहे, भारतातदेखील या क्रांतीची वाट मुकेश अं...