पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अभिव्यक्ती म्हणजे, सर्वोच्च न्यायालयाची बेअदबी का?

इमेज
फोकस/ पुरुषोत्तम सांगळे मराठी उद्योगपती अन्वय नाईक यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्हेगारी खटल्यातील आरोपी तथा रिपब्लिकन वृत्तवाहिनीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना सर्वोच्च न्यायालयात अगदीच तडकाफडकी अंतरिम जामीन मिळाला. बरे हा जामीन मिळाल्यानंतर हे संपादक महोदय वठणीवर येतील असे वाटले होते. परंतु, त्यांनी ज्या पद्धतीने बिभत्स प्रदर्शन घडविले; ते पाहाता, हे महाशय कायदा खिशात घालूनच फिरतात की काय? असा प्रश्‍न मनात निर्माण झाला. मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व महाराष्ट्र सरकार यांना खुले आव्हान देण्याची भाषा अर्णव यांनी केली. इतका माज येतो कसा? अन्वय नाईक यांनी आत्महत्या करण्यापूर्वी जी चिठ्ठी लिहिली होती, तीत अर्णव गोस्वामी यांचे स्पष्टपणे नाव आहे; तरीही देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या सत्ताकाळात अर्णव गोस्वामी यांना क्लीनचिट देण्याचे पाप केले होते. आता नाईक आत्महत्येच्या प्रकरणात अर्णव यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर कायदा त्यांच्या पद्धतीने काम करत असताना, त्याला राजकीय वळण देण्याचा घाणेरडा प्रकार भाजपने करून अर्णवला वाचविण्याचा प्रयत्न चालवला आहे. भाजप एका पत्र...