पोस्ट्स

जुलै, २०११ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

दरोडे नव्हे विकृती!

इमेज
वीरगाव किंवा कोठेवाडी येथील दरोडे हे समाजमनाच्या पटलावरून सहजासहजी विस्मरणात जाणार नाही. खरे तर हे दरोडे नाहीच. दरोड्यांत धनाची लूट होते. परंतु, वीरगावच्या दरोड्यातील नरपशुंनी धनापेक्षा इज्जतीची लूट केली. वासनांध रक्तपात हा कसला दरोडा झाला? ज्या दरोडेखोरांची नावे वारंवार अनेक घटनांत पुढे येत आहेत. त्या दरोडेखोरांची जमात इंग्रजी सत्तेच्या काळापूर्वीपासून, हे पाप वारंवार करत आली आहे. पोटासाठी ते दरोडे घालतात, असे गृहीत धरले तर पोटापाण्याची चांगली सोय एत्‌देशीय सरकारने पर्यायाने सुजाण समाजाने त्यांची केली आहे. त्यांना नोकर्‍यांमध्ये आरक्षण आहे, शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळते. या जमातीने चांगले शिकावे, समाजाच्या मुख्यप्रवाहात यावे. परंतु, स्वातंत्र्याच्या साठीनंतरही ही जमात आपले क्रौर्य त्यागास तयार नसेल तर आता समाजाने त्यांच्याशी जशास तसे वागावे का? ते जसे सुज्ञ समाजातील नागरिकांच्या घरात दरोडे घालतात, त्यांच्या लेकीबाळींच्या इज्जतीवर पिसाळलेल्या लांडग्यासारखे तुटून पडतात. तसा उद्या जर हा सुज्ञ समाज त्यांच्यावर तुटून पडला तर त्याचे काय परिणाम होतील? कायदा व सुव्यवस्था पाळणार्‍या समाजाची आत...

राज्ये छोटीच हवीत!

इमेज
छोटी राज्ये ही विकासाचे द्योतक आहेत. वर्गात कमी पटसंख्या असली म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याकडे शिक्षकाला जातीने लक्ष देता येते. त्याचप्रमाणे राज्ये छोटी असली म्हणजे केंद्रालाही या राज्यांसाठी विकासाचे नियोजन करणे, आणि विकासाचा स्त्रोत योग्य ठिकाणी पोहोचवणे शक्य होते. देशातील तेलंगणा, विदर्भ यांसह जवळपास अर्धा डझन प्रांतांनी स्वतंत्र होण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा चालविला आहे. स्थानिक पातळीवर भावनिक राजकारण होत असल्यामुळे अशा प्रकारच्या मागणीला विरोध होत असतो. आपली राजकीय मतपेटी फुटू नये, याची भीती सर्वच राजकीय पक्षांना असते. परंतु, या राजकीय भूमिकेला भीक न घालता आता ज्यांची मागणी असेल त्यांच्याबाबत सारासार विचार करून त्या प्रांतांना स्वतंत्र करण्याची भूमिका केंद्र सरकारने घेतली पाहिजेत. ही राज्ये स्वतंत्र होत आहेत म्हणजे ती काही भारतातून फुटून बाहेर पडत आहेत, असा ग्रह करून घेण्याची गरज नाही. लोकभावनेचा विचार करून केंद्र सरकारने आता तरी आपली नकारात्मक भूमिका बदलायला हवी. तेलंगणाही स्वतंत्र करा, उद्या विदर्भही स्वतंत्र करा...! आंध्र प्रदेशातील तेलंगणा प्रांताने स्वतंत्रतेचा विचार मांडल्य...

पेरते व्हा! पेरते व्हा!!

इमेज
पावसाची अवघी दोन नक्षत्रे वाया गेल्याने हतबल झालेल्या बळीराजाला आता काल परवाच्या पुनर्वसूने दिलासा दिला. हा पाऊस आठवडाभर चांगला पडेल, अशी दिलासादायक बातमीही हवामानतज्ज्ञांनी दिली आहे. शेतकरी आजकाल कमालीचा हळवा झाला आहे. जागतिक हवामान बदलाचे कृषिव्यवस्थेवर काय परिणाम होत आहेत, याकडे त्याचे लक्ष नाही. मृग नक्षत्रावर हजेरी लावलेल्या पावसाने नंतर उघडीप दिल्याने तो हतबल झाला. पेरण्या खोळंबल्या म्हणून तो चिंताग्रस्त झाला. ही हतबलता, ही चिंता समजता येण्यासारखी आहे. परंतु, हवामान बदलामुळे पावसाळा पुढे सरकला हे बदलही आता लक्षात घेऊन मनाची तशी तयारी करण्याची दृष्टी आमच्या या सुजाण शेतकर्‍यांना कधी येईल, ते देव जाणे. बरे प्रसारमाध्यमांनी अशा परिस्थितीत प्रबोधन करण्याची गरज असताना, त्यांनीही या गोंधळात भर घालण्याचेच काम केले. त्यामुळे आता कोरडा दुष्काळ पडतो, की काय असे वातावरण राज्यात आणि एकूणच नगर जिल्ह्यात तयार झाले. हमखास पावसाची नऊ नक्षत्रे आहेत. त्यापैकी केवळ दोनच नक्षत्रे वाया गेली. आता परवापासून पुनर्वसू सुरु झाले असून, आणखी सात नक्षत्रे हातात आहेत. पुढचे पुष्य, आश्‍लेषा, मघा, पूर्वा, उत्तर...