टाटा मोठे की महाराष्ट्र? ---- फोकस पुरुषोत्तम सांगळे/ सहाय्यक संपादक ---------- पूर्ववाहिनी नदीखोर्यातील नद्या व पाण्याचे प्रवाह वळवून ते पश्चिम वाहिनी करत टाटांनी भीमा नदीच्या तुटीच्या खोर्यात तब्बल 48.97 टीएमसी पाणी अडविले आहे. हे पाणी मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्राला मिळाले तर सद्याचा भीषण दुष्काळ निकाली निघेल. शंभर वर्षांपूर्वी इंग्रजांशी झालेल्या करारमदारांनुसार ही धरणे टाटांनी बांधली होती. या पाण्याचा वापर ते वीजनिर्मितीसाठी करत आहेत. ही वीज मुंबईला विकून टाटांना नफा मिळतो. भारतीय राज्यघटनेच्या कलम 21 नुसार पाणी हे मूलभूत हक्क आहे. त्याचा अशाप्रकारे खासगी वापर हा घटनेच्या मुलभूत हक्कांचे उल्लंघन ठरायला हवे. टाटांनी इंग्रजांशी केलेल्या करारांची वैद्यता तपासली जाणे गरजेचे आहे. जेणे करून दुष्काळी भागाला या धरणांतील पाणी मिळेल. हे पाणी मिळण्यासाठी राज्य सरकारने तातडीने पाऊले उचलावीत. सरकार काहीच करणार नसेल तर जनतेनेच टाटा आणि या सरकारच्या साटेलोटेविरुद्ध रस्त्यावर उतरायला हवे! ------- टाटांच्या धरणांत भीमानदीच्या तुटीच्या खोर्यातील 48.97 टीएमसी इतके प्रचंड पाणी पश्चिम घा...