शरद पवारांचा घरचा आहेर!
आपले पंतप्रधान दुबळे, कमकुवत आहेत म्हणूनच सर्वसामान्य नागरिकांच्या नशिबी दुर्देवाचे दशावतार आले आहेत. विविध घोटाळ्यांनी केंद्र सरकार जसे गाजते आहे, तसेच सामान्य नागरिकांना बसणार्या महागाईच्या झळांनी या सरकारविरुद्ध जनतेत असंतोष पेटला गेला आहे. या असंतोषालाच पंतप्रधानांवर टीका करून शरद पवारांनी वाट मोकळी करून दिली. पंतप्रधान कमकुवत आहेत, ते निष्क्रिय राहिले म्हणूनच विविध घोटाळे घडले आणि न्यायसंस्था व अण्णा हजारेंसारख्या यंत्रणा सक्रीय झाल्या, असे निरीक्षण पवारांनी नोंदवले होते, हे निरीक्षण वास्तवदर्शी आहे. अन्न सुरक्षा कायदा हे युपीए अध्यक्षा सोनिया गांधींचे भलेही स्वप्न असेल परंतु, या कायद्याची अमलबजाणी करताना जी आर्थिक घडी विस्कटेल त्याचा विचार कधी झाला नाही. गोरगरीबांना अन्न मिळावे, हे चांगले ध्येय आहे. परंतु, त्यासाठी देशाच्या आर्थिक परिस्थितीचाही विचार व्हावा, असे पवार म्हणाले होते. आज जरी पवार सत्तेत असतानाही विरोधकांची भूमिका वठवत असले तरी त्यांची टीका म्हणजे पंतप्रधानांचा आजार बरा होण्यासाठी पाजलेले कडू औषधच म्हणावे लागेल. ... शरद पवार यांचे राजकारण आता बर्यापैकी महाराष्ट्राला...