रॉबर्ट वढेरा कोण रं भाऊ !
पाकिस्तानातून आलेल्या राजेंद्र व मोरिना वढेरा या दाम्पत्याचा रॉबर्ट हा चिरंजीव. तांबे व लाकडाच्या कलाकुसरीच्या वस्तू विकून पोट भरणार्या दाम्पत्याचा हा रॉबर्ट, स्व. इंदिरा गांधी यांची नात प्रियंका गांधी यांच्याशी सूत जुळवतो व त्यांच्याशी विवाह करतो. केवळ या एकाच कामगिरीच्या जोरावर अवध्या तीनच वर्षात तो ५० लाख रुपये असलेली संपत्ती ५०० कोटी रुपयांची करतो! याला चमत्कार म्हणावे का? परंतु, हा चमत्कार कसा झाला याचा पर्दाफाश अरविंद केजरीवाल यांनी केलाच आहे. भ्रष्टाचाराचा नवा चेहरा म्हणून या रॉबर्टकडे पाहावे लागेल. हा रॉबर्ट कोण रं भाऊ? असा प्रश्न जर पडत असेल तर त्याचे उत्तर हेच, की हा रॉबर्ट म्हणजे मोठा भ्रष्टाचारी माणूस, त्याचे पुरावे केजरीवाल अन् ऍड. भूषण यांनी दिलेच आहे. तसेच, तो सोनिया गांधी यांचा जावई असल्याने कॉंग्रेसवाले आपल्या सर्व देशवासीयांचादेखील तो जावई असल्याचे माथी मारू पाहात आहेत !
.......
अवघ्या तीन-चार वर्षात ५० लाखाचे ५०० कोटी करणारा हा रॉबर्ट वढेरा कोण रं भाऊ? असा बुचकाळ्यात पाडणारा प्रश्न आमच्या खेडूतांना पडला असेल तर त्याचे उत्तर हे आहे, रॉबर्ट हा स्व. इंदिरा गांधी यांची नात प्रियंका गांधी-वढेरा यांचा नवरा, कॉंग्रेस तथा संयुक्त पुरोगामी आघाडी (युपीए) सरकारच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचा जावई, पर्यायाने अख्ख्या भारताचा अलिकडे तो जावई ठरु पाहात आहे. वढेरा याचे कुटुंब मुळचे पाकिस्तानातील स्यालकोट येथील रहिवासी. फाळणीनंतर रॉबर्टचे वडिल राजेंद्र वढेरा हे भारतात आले व उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे स्थिरस्थावर झाले. तेथे या कुटुंबाने तांबे व लाकडाच्या कलाकुसरीच्या वस्तू विकण्याचा धंदा सुरु केला. राजेंद्र वढेरा यांनी स्कॉटिशवंशीय शिक्षिका मोरिना यांच्याशी विवाह केला. या दोघांना १८ एप्रिल १९६९ रोजी रॉबर्ट वढेरा नावाचे पुत्ररत्न (?) प्राप्त झाले. रॉबर्ट याला रिचर्ड नावाचा भाऊ आणि मिशेल नावाची बहिणदेखील आहे. प्रियंका गांधी आणि रॉबर्ट याची पहिली मुलाखत एका पार्टीत झाली. त्यानंतर त्यांचे प्रेमसंबंध वाढत गेले आणि १९९७ मध्ये या दोघांनी विवाह केला. या विवाहाला रॉबर्टच्या वडिलांचा तीव्र विरोध होता. हा झाला रॉबर्ट वढेरा याचा पूर्वेतिहास. आता सामाजिक कार्यकर्ते अरविंद केजरीवाल यांनी या रॉबर्टच्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करुन एका नव्या वर्तमानाला उजाळा दिला. शेजारी पाकिस्तानातदेखील असेच काहीसे कथानक जुळून आल्याचे सर्वांना माहित असेल. पाकच्या दिवंगत पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांचे पती व पाकचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष असिफअली झरदारी यांनी बेनझीर यांच्या सत्ताकाळात भ्रष्टाचाराचा सपाटा लावला व मोठ्या प्रमाणात संपत्ती जमा केली होती. आजही या झरदारी यांना मिस्टर टेन पर्सेंट असे म्हणून ओळखले जाते. खरे तर पाक हा भारतापेक्षा मागासलेला देश आहे. परंतु, तेथे बायको पंतप्रधान असतानाही या झरदारी महोदयांवर खटले चालले. त्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपांत गजाआड राहावे लागले. भारतात मात्र नेमके याच्या उलट चित्र आहे. वढेरांवर भ्रष्टाचाराचे आरोप होताच अख्खा कॉंग्रेस पक्ष त्याच्या बचावासाठी मैदानात उतरला. केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम् यांनी त्याच्या चौकशीला स्पष्ट शब्दांत नकार दिला. कॉंग्रेसचे प्रवक्ते सांगणारे वेगवेगळे चेहरे विविध चॅनलवर रॉबर्ट कसा चांगला आहे, कसा धुतल्या तांदळाचा आहे, हे सांगण्यासाठी तोंडाची वाफ गमावत आहेत. गांधी घराण्याप्रती स्वामीनिष्ठता दाखविण्यासाठी अगदी दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत सर्वच नेते रॉबर्ट वढेरा कसा चांगला माणूस आहे आणि केजरीवाल कसे प्रसिद्धीसाठी असले बिनबुडाचे आरोप करत आहेत, हे सांगत फिरत आहे. हा रॉबर्ट वढेरा कोणत्याही शासकीय पदावर नाही. एक साधा उद्योगपती आहे. तरीदेखील त्याला खास कमांडोचे (एसपीजी) संरक्षण आहे. विमानतळावर केवळ देशासाठी अतिमहत्वाच्या असलेल्या व्यक्तींना तपासल्या जात नाहीत. त्या खास व्यक्तींच्या यादीत याचेदेखील नाव आहे. ही सवलत कशाच्या आधारावर रॉबर्टला मिळते, याचे उत्तर कॉंग्रेसवाले देतील का? सोनियांचा जावई असलेला हा रॉबर्ट देशाचा जावई झाला का? म्हणून त्याला खास सवलती मिळतात. बांधकाम क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी असलेली डीएलएफमध्ये या रॉबर्टची भागीदारी आहे. सध्या या भागीदारीसाठी त्याने केलेल्या गडबड घोटाळ्यामुळेच तो चर्चेत आला. आणि, केजरीवाल यांनी डीएलएफ व वढेरा याच्या संबंधातून झालेल्या भ्रष्टाचाराला भरगच्च पत्रकार परिषदेत वाचा फोडून देशवासीयांना अक्षरशः थक्क केले. रॉबर्ट वढेरा याने दिल्ली व हरियाणा सरकारसह केंद्र सरकारवरदेखील दबाव आणून शेकडो कोटी रुपयांची मालमत्ता डीएलएफच्या माध्यमातून बेकायदेशीररीत्या गोळा केली. केजरीवाल यांच्या आरोपानुसार, २००७ ते २०१० या तीनच वर्षात वढेरा याच्या संपत्तीत ५० लाखावरुन ३०० कोटी रुपयांची वाढ झाली. आज याच संपत्तीची बाजारभावानुसार किमत ५०० कोटी रुपयांच्या घरात आहे. उत्पन्नाचे कोणतेही साधन नसताना केवळ डीएलएफच्या भागीदारीवर, डीएलएफने वढेरा याला ६५ कोटी रुपये बिनव्याजी दिले. आजकाल सख्खा भाऊ भावाला हजार-पाचशे रुपये उसणे देत नाही, तेथे डीएलएफने वढेरा याला एवढे पैसे दिले कसे, हे मोठे कोडेच आहे. एवढेच नाही तर या रॉबर्टने किमान १० कंपन्यांच्या माध्यमांतून कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा आरोप केजरीवाल यांनी केलाच आहे. केंद्रातील युपीए सरकार हे घोटाळ्यांचे सरकार आहे. पंतप्रधानांसह कुणीही घोटाळ्यांतून सुटू शकले नाही. आता सोनियांचा जावईच भ्रष्टाचारात नखशिखांत बुडालेला असल्याने या देशातील गोरगरीबांची कॉंग्रेसप्रती असलेली भावना पार बदलून गेली. कॉंग्रेस हा आम आमदमीचा पक्ष नाही तर घोटाळेखोरांचा व देशाला लुटणार्यांचा पक्ष आहे का? असा संतप्त सवाल जनता करत आहे. पाकिस्तानात भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर पंतप्रधानांच्या नवर्याची चौकशी होऊ शकते. त्याला खडी फोडायला कारागृहात जावे लागते. तसे या रॉबर्ट वढेराची चौकशी करण्यास का टाळाटाळ केली जात आहे. त्याला गजाआड का केले जात नाही? सरकार त्याचा बचाव का करत आहे, याची उत्तरे कॉंग्रेस देऊ शकत नाही. कारण, सोनियांचा जावई म्हणजे देशाचा जावई आणि आपल्याकडे जावयाला मोठा मान असतो. हा मानच कॉंग्रेसवाले या रॉबर्टला देत आहेत, असे दिसते. हा रॉबर्ट आपण कॉंग्रेससमर्थक असल्याचे सांगत असतो. २००१ मध्ये त्याने एक सूचना वृत्तपत्रातून प्रकाशित केली होती, की त्याचे वडिल व भाऊ आपल्या नावाचा गैरवापर करुन लोकांना नोकरीचे आमिष दाखवत फसवत आहेत. त्यांच्याशी आपला काही संबंध नाही. या सूचनेवरुन त्याचे वडिल राजेंद्र वढेरा यांनी रॉबर्टला कोर्टात खेचत मानहानीची केस दाखल केली होती. राजेंद्र व मोरिन (रॉबर्टची आई) यांनी फारकत घेतली. आता ही बाईदेखील अनेक कंपन्यांची मालकीन आहे व त्यातही भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. रॉबर्टची बहिण मिशेल हिचा २००१ मध्ये एका कार अपघातात संशयास्पद मृत्यू झाल्याचे कळते. तर भाऊ रिचर्ड याने २००१ मध्येच आत्महत्या केली होती. वडिल राजेंद्र यांचाही हृदय बंद पडून २००९ मध्ये दिल्लीत संशयास्पद मृत्यू झाला होता. काही लोकांचे म्हणणे आहे, की ती आत्महत्या होती. देशाचा जावई ठरलेल्या या रॉबर्टचे अख्खे चरित्रच संशयास्पद वाटते. केजरीवाल आणि ज्येष्ठ विधिज्ज्ञ प्रशांत भूषण यांनी त्याच्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश केला असताना त्याने या दोन समाजसेवकांविरुद्ध मानहानीचा खटला गुदरला नाही, याचा अर्थच हे सर्व आरोप सत्य असावेत, याला बळकटी मिळते. या कॉंग्रेस सरकारचे तसेही दिवस भरलेलेच आहेत. हे सरकार अत्यंत अपमानास्पदरीत्या सत्तेवरुन पायउतार होईल. त्याला अनेक घोटाळे आणि भ्रष्टाचारासह या जावई रॉबर्टचा कलंकित महाप्रतापही कारणीभूत असेल!
(पूर्वप्रकाशन : दैनिक देशदूत, दि. १४ ऑक्टोबर २०१) अवघ्या तीन-चार वर्षात ५० लाखाचे ५०० कोटी करणारा हा रॉबर्ट वढेरा कोण रं भाऊ? असा बुचकाळ्यात पाडणारा प्रश्न आमच्या खेडूतांना पडला असेल तर त्याचे उत्तर हे आहे, रॉबर्ट हा स्व. इंदिरा गांधी यांची नात प्रियंका गांधी-वढेरा यांचा नवरा, कॉंग्रेस तथा संयुक्त पुरोगामी आघाडी (युपीए) सरकारच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचा जावई, पर्यायाने अख्ख्या भारताचा अलिकडे तो जावई ठरु पाहात आहे. वढेरा याचे कुटुंब मुळचे पाकिस्तानातील स्यालकोट येथील रहिवासी. फाळणीनंतर रॉबर्टचे वडिल राजेंद्र वढेरा हे भारतात आले व उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे स्थिरस्थावर झाले. तेथे या कुटुंबाने तांबे व लाकडाच्या कलाकुसरीच्या वस्तू विकण्याचा धंदा सुरु केला. राजेंद्र वढेरा यांनी स्कॉटिशवंशीय शिक्षिका मोरिना यांच्याशी विवाह केला. या दोघांना १८ एप्रिल १९६९ रोजी रॉबर्ट वढेरा नावाचे पुत्ररत्न (?) प्राप्त झाले. रॉबर्ट याला रिचर्ड नावाचा भाऊ आणि मिशेल नावाची बहिणदेखील आहे. प्रियंका गांधी आणि रॉबर्ट याची पहिली मुलाखत एका पार्टीत झाली. त्यानंतर त्यांचे प्रेमसंबंध वाढत गेले आणि १९९७ मध्ये या दोघांनी विवाह केला. या विवाहाला रॉबर्टच्या वडिलांचा तीव्र विरोध होता. हा झाला रॉबर्ट वढेरा याचा पूर्वेतिहास. आता सामाजिक कार्यकर्ते अरविंद केजरीवाल यांनी या रॉबर्टच्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करुन एका नव्या वर्तमानाला उजाळा दिला. शेजारी पाकिस्तानातदेखील असेच काहीसे कथानक जुळून आल्याचे सर्वांना माहित असेल. पाकच्या दिवंगत पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांचे पती व पाकचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष असिफअली झरदारी यांनी बेनझीर यांच्या सत्ताकाळात भ्रष्टाचाराचा सपाटा लावला व मोठ्या प्रमाणात संपत्ती जमा केली होती. आजही या झरदारी यांना मिस्टर टेन पर्सेंट असे म्हणून ओळखले जाते. खरे तर पाक हा भारतापेक्षा मागासलेला देश आहे. परंतु, तेथे बायको पंतप्रधान असतानाही या झरदारी महोदयांवर खटले चालले. त्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपांत गजाआड राहावे लागले. भारतात मात्र नेमके याच्या उलट चित्र आहे. वढेरांवर भ्रष्टाचाराचे आरोप होताच अख्खा कॉंग्रेस पक्ष त्याच्या बचावासाठी मैदानात उतरला. केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम् यांनी त्याच्या चौकशीला स्पष्ट शब्दांत नकार दिला. कॉंग्रेसचे प्रवक्ते सांगणारे वेगवेगळे चेहरे विविध चॅनलवर रॉबर्ट कसा चांगला आहे, कसा धुतल्या तांदळाचा आहे, हे सांगण्यासाठी तोंडाची वाफ गमावत आहेत. गांधी घराण्याप्रती स्वामीनिष्ठता दाखविण्यासाठी अगदी दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत सर्वच नेते रॉबर्ट वढेरा कसा चांगला माणूस आहे आणि केजरीवाल कसे प्रसिद्धीसाठी असले बिनबुडाचे आरोप करत आहेत, हे सांगत फिरत आहे. हा रॉबर्ट वढेरा कोणत्याही शासकीय पदावर नाही. एक साधा उद्योगपती आहे. तरीदेखील त्याला खास कमांडोचे (एसपीजी) संरक्षण आहे. विमानतळावर केवळ देशासाठी अतिमहत्वाच्या असलेल्या व्यक्तींना तपासल्या जात नाहीत. त्या खास व्यक्तींच्या यादीत याचेदेखील नाव आहे. ही सवलत कशाच्या आधारावर रॉबर्टला मिळते, याचे उत्तर कॉंग्रेसवाले देतील का? सोनियांचा जावई असलेला हा रॉबर्ट देशाचा जावई झाला का? म्हणून त्याला खास सवलती मिळतात. बांधकाम क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी असलेली डीएलएफमध्ये या रॉबर्टची भागीदारी आहे. सध्या या भागीदारीसाठी त्याने केलेल्या गडबड घोटाळ्यामुळेच तो चर्चेत आला. आणि, केजरीवाल यांनी डीएलएफ व वढेरा याच्या संबंधातून झालेल्या भ्रष्टाचाराला भरगच्च पत्रकार परिषदेत वाचा फोडून देशवासीयांना अक्षरशः थक्क केले. रॉबर्ट वढेरा याने दिल्ली व हरियाणा सरकारसह केंद्र सरकारवरदेखील दबाव आणून शेकडो कोटी रुपयांची मालमत्ता डीएलएफच्या माध्यमातून बेकायदेशीररीत्या गोळा केली. केजरीवाल यांच्या आरोपानुसार, २००७ ते २०१० या तीनच वर्षात वढेरा याच्या संपत्तीत ५० लाखावरुन ३०० कोटी रुपयांची वाढ झाली. आज याच संपत्तीची बाजारभावानुसार किमत ५०० कोटी रुपयांच्या घरात आहे. उत्पन्नाचे कोणतेही साधन नसताना केवळ डीएलएफच्या भागीदारीवर, डीएलएफने वढेरा याला ६५ कोटी रुपये बिनव्याजी दिले. आजकाल सख्खा भाऊ भावाला हजार-पाचशे रुपये उसणे देत नाही, तेथे डीएलएफने वढेरा याला एवढे पैसे दिले कसे, हे मोठे कोडेच आहे. एवढेच नाही तर या रॉबर्टने किमान १० कंपन्यांच्या माध्यमांतून कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा आरोप केजरीवाल यांनी केलाच आहे. केंद्रातील युपीए सरकार हे घोटाळ्यांचे सरकार आहे. पंतप्रधानांसह कुणीही घोटाळ्यांतून सुटू शकले नाही. आता सोनियांचा जावईच भ्रष्टाचारात नखशिखांत बुडालेला असल्याने या देशातील गोरगरीबांची कॉंग्रेसप्रती असलेली भावना पार बदलून गेली. कॉंग्रेस हा आम आमदमीचा पक्ष नाही तर घोटाळेखोरांचा व देशाला लुटणार्यांचा पक्ष आहे का? असा संतप्त सवाल जनता करत आहे. पाकिस्तानात भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर पंतप्रधानांच्या नवर्याची चौकशी होऊ शकते. त्याला खडी फोडायला कारागृहात जावे लागते. तसे या रॉबर्ट वढेराची चौकशी करण्यास का टाळाटाळ केली जात आहे. त्याला गजाआड का केले जात नाही? सरकार त्याचा बचाव का करत आहे, याची उत्तरे कॉंग्रेस देऊ शकत नाही. कारण, सोनियांचा जावई म्हणजे देशाचा जावई आणि आपल्याकडे जावयाला मोठा मान असतो. हा मानच कॉंग्रेसवाले या रॉबर्टला देत आहेत, असे दिसते. हा रॉबर्ट आपण कॉंग्रेससमर्थक असल्याचे सांगत असतो. २००१ मध्ये त्याने एक सूचना वृत्तपत्रातून प्रकाशित केली होती, की त्याचे वडिल व भाऊ आपल्या नावाचा गैरवापर करुन लोकांना नोकरीचे आमिष दाखवत फसवत आहेत. त्यांच्याशी आपला काही संबंध नाही. या सूचनेवरुन त्याचे वडिल राजेंद्र वढेरा यांनी रॉबर्टला कोर्टात खेचत मानहानीची केस दाखल केली होती. राजेंद्र व मोरिन (रॉबर्टची आई) यांनी फारकत घेतली. आता ही बाईदेखील अनेक कंपन्यांची मालकीन आहे व त्यातही भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. रॉबर्टची बहिण मिशेल हिचा २००१ मध्ये एका कार अपघातात संशयास्पद मृत्यू झाल्याचे कळते. तर भाऊ रिचर्ड याने २००१ मध्येच आत्महत्या केली होती. वडिल राजेंद्र यांचाही हृदय बंद पडून २००९ मध्ये दिल्लीत संशयास्पद मृत्यू झाला होता. काही लोकांचे म्हणणे आहे, की ती आत्महत्या होती. देशाचा जावई ठरलेल्या या रॉबर्टचे अख्खे चरित्रच संशयास्पद वाटते. केजरीवाल आणि ज्येष्ठ विधिज्ज्ञ प्रशांत भूषण यांनी त्याच्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश केला असताना त्याने या दोन समाजसेवकांविरुद्ध मानहानीचा खटला गुदरला नाही, याचा अर्थच हे सर्व आरोप सत्य असावेत, याला बळकटी मिळते. या कॉंग्रेस सरकारचे तसेही दिवस भरलेलेच आहेत. हे सरकार अत्यंत अपमानास्पदरीत्या सत्तेवरुन पायउतार होईल. त्याला अनेक घोटाळे आणि भ्रष्टाचारासह या जावई रॉबर्टचा कलंकित महाप्रतापही कारणीभूत असेल!

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा