भाजपचे 'माधवंम'! ......... माळी, धनगर अन् वंजारी (माधवं) हा ओबीसीतील मोठा जातसमूह सोबत घेऊन स्व. गोपीनाथ मुंडे यांनी राज्यातील सत्तासमिकरणे बदलली होती. सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग राबविताना, तो कमालीचा यशस्वीही करून दाखविला होता. आतादेखील आगामी विधानसभेसाठी रणनीती आखताना भाजप-संघातील चाणक्य माधवंसोबतच त्यात मराठाही मिळविण्याची व्यूहरचना करत आहेत. ती कितपत यशस्वी ठरेल, हे काळाच्या ओघात स्पष्ट होईलच; परंतु मराठा समाज भाजपच्या या भुलभुलय्याला भुलेल का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल! ............ आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यातील सत्ता ताब्यात घेण्यासाठी भारतीय जनता पक्षाने रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. रा. स्व. संघ अन् भाजपातील चाणक्य सध्या यासंदर्भात चिंतनात मग्न असून, त्यांच्या चिंतनातून तूर्त एक धक्कादायक रणनीती बाहेर पडली. राज्यात सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी राबविला होता. या प्रयोगाचे फलित म्हणजे शेठजी-भटजींचा पक्ष अशी भाजपची असलेली ओळख पुसून तो बहुजन समाजापर्यंत पोहोचला होता. शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे अन् स्व. मुंडे-महाजन...