२१ व्या शतकातील गुजरातचे नीरो! रोम जळत असताना रोमन सम्राट नीरो हा व्हायोलिन वाजवित होता, असे इतिहास सांगतो. धार्मिक दंगलीचे दाहक चटके सहन केलेला गुजरात आज कुपोषणाने कलंकित झाला आहे. धार्मिकद्वेषाने आजही गुजरात जळत असताना, तेथील नीरो विकासाच्या व्हायोलिनचे तुणतुणे वाजविण्यात मश्गुल आहेत. तरुण महिलांत रक्ताचे प्रमाण कमी असून, त्या कुपोषित असताना मोदीमहोदयांना त्यात रेखीव शरीराचे रहस्य वाटते. रोमचा सम्राट होऊन इतिहास झाला. परंतु, तो आजही गुजरातमध्ये जीवंत असावा, असा संशय येतो आहे. ..... विकसनशील राष्ट्र म्हणून ज्या कुपोषण आणि भूकमारीमुळे भारताच्या प्रतिमेला धब्बा लागला. ज्या कुपोषणाला भारताचे पंतप्रधान राष्ट्रीय कलंक म्हणून घोषित करतात. त्याच देशातील सर्वात विकसित राज्य असा दावा करणारे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी, कुपोषणाला फॅशन व रेखीव सौदर्याचे प्रतिक व तरुणींच्या सौंदर्यविषयक जागृततेचे प्रमाणपत्र बहाल करत आहेत. गुजरात विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. या निवडणुकांवर डोळा ठेवून नरेंद्र मोदी यांनी सरकारने केलेल्या तथाकथित विकासाचा डिंगोरा पिटविण्यास सुरुवात केली आहे...
पोस्ट्स
सप्टेंबर, २०१२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
पंतप्रधानांनी राजीनामा देणेच श्रेयस्कर! पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची प्रतिमा डागाळण्याचे काम सध्या अमेरिकन व ब्रिटनची प्रसारमाध्यमे करत आहेत. डॉ. सिंग यांच्या सत्ताकाळात घोटाळ्यांचा उच्चांक झाला, हे खरे असले तरी त्यांच्या विद्वत्तेवर व प्रामाणिकपणावर संशय घेणे योग्य ठरणार नाही. खरे तर राजकारण हा कधीच डॉ. सिंग यांचा प्रांत नव्हता. ते कुशल नोकरशहा असून, अर्थतज्ज्ञ आहेत. कलंकित होत जाणारी प्रतिमा पाहाता, त्यांनी राजीनामा देऊन कधीही या राजकीय चिखलातून बाहेर पडणे श्रेयस्कर ठरेल. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर अलिकडे विदेशी प्रसारमाध्यमे फारच तोंडसुख घेत आहेत. भारतीय प्रसारमाध्यमे पंतप्रधानांना लक्ष्य करतात, ही बाब समजण्यासारखी आहे. मोठ्या प्रमाणात उघड होणारे घोटाळे, जनतेत सरकारबद्दल असलेला रोष आणि विरोधी पक्षांनी उघडलेली जोरदार मोहीम यामुळे पंतप्रधानांवर देशी प्रसारमाध्यमे टीका करतात, ही बाब समजण्यासारखी आहे. परंतु, पंतप्रधान निष्क्रीय आहेत, ते मौनी आहेत. कूचकामी आहेत, असा ठपका ठेवून भारतीय पंतप्रधानांची आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिमा मलिन करण्याचे काम विदेशी प्रसारमाध्यमे करत असती...