पोस्ट्स

फेब्रुवारी, २०११ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

लोहपुरुषाची क्षमायाचना

भारतीय जनता पक्षाने ज्यांना पंतप्रधानपदासाठी जनतेसमोर प्रस्तुत केले होते. ज्यांना आजरोजी त्यांच्याच पक्षातर्फे लोहपुरूष म्हणून उल्लेखल्या जाते, ते ज्येष्ठनेते लालकृष्ण अडवाणी हे अखिल भारतीय कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची काळ्या पैशाच्या प्रकरणावरून केलेल्या आरोपात माफी मागून मोकळे झाले आहेत. खरे तर त्यांची ही माफी म्हणजे त्यांच्या राजकीय अपरिपक्वतेचे लक्षणच मानावे का, हा प्रश्न निर्माण होतो. गेली कित्येक दशके अडवाणी हे राजकारणात सक्रीय आहेत. भारताचे गृहमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलेले असून, त्यांचे बहुतांश आयुष्य संसदेत व्यतीत झालेले आहे. अशा लोहपुरुषावर त्या मानाने अलीकडे राजकारणात आलेल्या सोनिया गांधी यांची माफी मागण्याची वेळ यावी, हे दुर्देवच म्हणावे लागेल. गांधी परिवाराचा पैसा स्वीस बँकांत आहे, असा आरोप अडवाणी यांनी केला होता. त्यांच्यासारखा ज्येष्ठ व्यक्ती असा आरोप करतो म्हणजे, तो खराच असावा, अशी एक मानसिकता निर्माण झाली होती. परंतु, हा आरोप अडवाणींना सिद्ध करता आला नाही, म्हणजेच आडात नाही तर पोहर्‍यात कुठून या तत्त्वाप्रमाणे गांधी परिवाराचा पैसा स्वीस बँकात नाही, हे ...
इमेज
विवेकानंद जन्मोत्सव हा विदर्भातील सर्वात मोठा सोहळा, बुलडाणा जिल्ह्यातील हिवरा आश्रम येथे साजरा केल्या जातो. यावेळी तीन लाख भाविकांसाठी सुमारे 15 लाख पुर्‍या व 100 क्विंटल वाग्यांचा महाप्रसाद बनविण्यात येतो. या महाप्रसाद तयारीचे 25 जानेवारी 2011 रोजी टीपलेले छायाचित्र. विवेकानंद आश्रमाचे संस्थापक अध्यक्ष हे मानवहितकारी संत असून, अवघा चौथा वर्ग शिक्षण घेतलेले हे महात्मा अतिप्रगत अशा ऍलोपॅथीद्वारे एक कोटी रुग्णांना व्याधीमुक्त करून बसले आहेत.

लव लेटर हुआ पुराना,

आता जी मंडळी चाळीशी-पंचचाळीशीमध्ये असेल त्यांनी त्यांच्या उमेदीच्या काळात म्हणजे ते जेव्हा शाळा-महाविद्यालयात शिकत होते तेव्हा; प्रेमपत्र लिहिले नसेल, असा एखाद-दुसराच अपवाद सापडू शकतो. या मंडळींना माहित असेल, ज्याला आजची पिढी अफेअर म्हणते त्याकाळी त्यालाच लफडे असे म्हटले जात होते, या मंडळींना असे लफडे करणे किती जबाबदारीचे, जोखमीचे आणि युद्ध जिंकण्यासारखे अवघड काम होते, हे चांगलेच ठाऊक आहे. बरे, हे लफडे ग्रामीण भागातले असेल तर मग्‌ विचारता सोय नाही. एक तर चोरून लपून भेटण्यासाठी आडोसे नसायचे, शेत, ओढे-नाल्यात गेलो तरी पकडल्या गेले नाही, असे क्वचित होत असे. एकदा पकडले गेले, की त्याची चर्चा गावभर आणि नजीकच्या उन्हाळ्यात प्रेयसीचे हातच पिवळे झाल्याचे पाहण्याचे दुर्देव या प्रेमविरांवर आले असेल. शहरीभागात यापेक्षा चांगली सोय होती. किमान शाळा-महाविद्यालयात भेटण्यासाठी वेळ मिळत असे. हळूच कंपास, किंवा वहीमध्ये रात्रभर जागून आणि अख्खी वही फाडून शेवटी शेवटी जे म्हणायचे ते मांडलेले प्रेमपत्र सरकावता येत असे. किमान एखादा सिनेमा तरी चोरून लपून सोबत पाहाता येत असे. खेड्यात पोरगी कुणाची का असेना प्रत्य...