पोस्ट्स

जून, २०१६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
इमेज
हे तर बहुजनांना राजकारणातून संपविण्याचे षडयंत्र! फोकस/ पुरुषोत्तम सांगळे स्वतःचे रक्त आटवून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केले. परंतु, दुर्देवाने हे स्वराज्य पेशवाईच्या हाती पडले. इतिहास सांगतो, की पेशवे शिवाजी महाराजांच्या जीवावर जगले. त्यांनी महाराजांचे स्वराज्य अक्षरशः विकून खाल्ले, त्यांच्या कायम जातीयवादी धोऱणामुळेच महाराजांचे समतामुलक स्वराज्य परकीयांच्या ताब्यात गेले. हा इतिहास येथे नमूद करण्याचे कारण म्हणजे, आधी छगन भुजबळ आणि आता राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्याबाबत जे कुटील राजकारण खेळले गेलेे, त्यांना राजकीय जीवनातून संपविण्याचे षडयंत्र रचले गेलेे, त्यामागची मानसिकता ही पेशवाईच्या वारसदारांचीच आहे. यशवंतराव चव्हाण, शरद पवार, गोपीनाथ मुंडे यासारख्या बहुजनांनी आपल्या अथक परिश्रमाने उभा केलेला हा प्रगतशील महाराष्ट्र दुर्देवाने आज पेशवाईच्याच ताब्यात गेला. त्यामुळे भुजबळ आणि खडसे यांसारख्या मातब्बर बहुजन नेत्यांवर गंडांतर आलेले आहे. ------- नागपुरातील रेशीमबागेच्या पेशवाईचे कटकारस्थान बहुजन नेत्यांना राजकीय जीवनातून संपविण्याचे कुटील ष...
इमेज
‘नालायकांची’ साथ सोडणे म्हणजे ‘मध्यावधी’! - फोकस/ पुरुषोत्तम सांगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व राज्यातील जाणकार नेते शरद पवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना ‘नालायक’ लोकांची संगत सोडण्याचा सल्ला दिला आहे. हा सल्ला वडिलकीच्या नात्याने खचितच दिला नसेल; राजकीय भूमिकेतूनच तो दिला गेला असेल, असे वाटते. पवारांच्या मनात काय आहे, हे कधीच महाराष्ट्राला सहजासहजी कळले नाही. परंतु, सरकार पाडण्याचा पवारांचा अनुभव तसा दांडगा आहे. उद्धव यांनी उद्या कथित नालायकांची साथ सोडलीच तर महाराष्ट्राला मध्यावधीला सामोरे जावे लागेल. त्याचा फायदा पवारांपेक्षा शिवसेनेलाच होईल, हे सांगण्यासाठी कुण्या ज्योतिष्याची गरज नसावी! --- एकवेळ मासा पाण्याशिवाय जीवंत राहू शकेल; परंतु शरद पवार सत्तेशिवाय राहू शकत नाहीत, असे गमतीने म्हटले जाते. ते कदाचित खरेही असेल. परंतु, सत्ता गेल्याचे शल्य पवारांना कधी जाणवले नाही. सत्ता गेली तशी त्यांनी आपल्या चाणाक्षपणे आणलीही. आतादेखील मोदी लाटेच्या भंपकगिरीत पवारांची राज्यातील सत्ता गेली. ही भंपकगिरी दोन वर्षातच उघड पडल्याने गेलेली सत्ता परत ये...
इमेज
बाबांनो, महाराष्ट्र तुम्हाला फिदीफिदी हसतो आहे! राज्यात सत्तेवर असलेल्या शिवसेना आणि भाजपमध्ये ज्या शाब्दिक लाथाळ्या सुरू आहेत, त्या पाहाता उभा महाराष्ट्र या दोन्ही पक्षांना फिदीफिदी हसत आहे. महाराष्ट्राचे हे हसणे पहायचे असेल तर या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी लोकांच्या व्हॉट्स अ‍ॅपवर फिरणारे मॅसेज एकदा पाहूनच घ्यावेत. सत्तेत राहून तुम्ही जो तमाशा लावला, तो या पुरोगामी राज्याच्या प्रतिमेला शोभणारा नाही. तुम्हाला एकमेकांशी गुण्यागोविंदाने संसार करणे जमत नसेल तर खुशाल काडीमोड घ्या; परंतु तुमच्या लाथाळ्या एकदाच्या थांबवा. तुमच्या पोरकटपणामुळे राज्याची प्रतिमा खराब होत आहे. तीच प्रतिमा उंचविण्यासाठी यापूर्वी यशवंतराव चव्हाणांपासून ते शरद पवार, स्व. बाळासाहेब ठाकरेंपर्यंत सर्वांनी रक्ताचे पाणी केले होते, हे विसरू नका! ---- शिवसेना : काय बघतो रं भाजप : कुठं काय? शासन बघतोय.. शिवसेना : शासन? मगा पासून डॉळं वासून बघतोय की माझ्याकडं भाजप : तुला कसं कळलं तुझ्याकडं बघतोय ते.. शिवसेना : मी माझ्या डोळ्यांनी पायलं.. भाजप : तूच कशाला बगती मग, तूच नको बगू की.. शिवसेना : मी बगीन ना...