ही तर वादळापूर्वीची शांतता?
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सध्या जिल्ह्यात शांतता भासत असली तरी ही वादळापूर्वीची शांतता आहे. जिल्ह्याचे राजकारण हे सहजासहजी कळण्यापलिकडचे असते. या जिल्ह्यात ठरवूनच राजकीय चमत्कार घडविले जात असतात. सध्या लोकसभेचे दोन्ही मतदारसंघ कॉंग्रेसने मागितले असले तरी त्यामागच्या राजकीय रणनीतीचा भाग हा सामान्यांना कळण्यापलिकडचा आहे. सारिपाटाच्या खेळात आपल्या चाली खेळताना त्याचा अंदाज समोरच्याला लागू द्यायचा नसतो. जिल्ह्याच्या राजकीय सारिपाटावर सध्या जो खेळ मांडला जात आहे, त्यातील चाली फारच अफलातून वाटतात. कसलेल्या नेत्यांच्या या चालीत पुढील काळात राजकीय उलथापालथ अन् कुरघोडीच्याच राजकारणाचा दृष्य परिणाम पाहावयास मिळेल.
.....
नगर जिल्ह्याचे राजकारणच मोठे विचित्र. एखादा नेता जेव्हा काही राजकीय भाष्य करतो, तेव्हा त्या भाष्यात राजकीय उलथापालथीचे संकेत दडलेले असतात. दक्षिणेकडे पाहात उत्तरेकडे डोळा मारण्याचे अफलातून कसब याच जिल्ह्यातील नेत्यांना अवगत झालेले आहे. जिरवाजिरवीच्या अन् कुरघोडीच्या राजकारणात या जिल्ह्यातील नेत्यांचा हात कुणी पकडू शकणार नाही. आतादेखील लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय शांतता वाटत असली तरी, ही वादळापूर्वीचीच शांतता असून, आतल्या अन् वरच्या गोटात राजकीय रणनीतीची गणिते मांडण्यास सुरुवात झाली आहे. जेथे कुठे मातीचा ढीग दिसत असतो तेथे कुठेतरी खड्डा हा पडलेला असतोच. तसेच काहीसे सध्या जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. दक्षिण अन् उत्तरेच्या दोन्ही जागांची मागणी जेव्हा कॉंग्रेसचे नेतृत्व पुढे करते; तेव्हा निश्चितच हा कुठेतरी राजकीय पलटवार करण्याच्या व्यूहरचनेचाच भाग असतो, हे अगदी उघड सत्य आहे. असे म्हटले जाते, की ज्याला नगर जिल्ह्याचे राजकारण कळले तो दिल्लीत देशाचे यशस्वी राजकारण करू शकतो. कदाचित, असे म्हणणे हे अतिशयोक्तीचे असेल. परंतु, या म्हणण्यामागील मतितार्थ असा, की जिल्ह्याचे राजकारण हे सर्वसामान्यांनाच काय परंतु, दिग्गजांनादेखील कळण्यापलिकडचे आहे. आज एकमेकांसोबत दिसणारे नेते कधी कुणाचा राजकीय गेम करतील, याची शाश्वती देता येत नाही. अन्, आज विरोधात दंड थोपाटणारे नेते उद्या गळ्यात गळे घालून फिरतील, असेही चित्र दिसू शकते. वरिल सर्व विचारांचा उहापोह करण्याचे कारण म्हणजे, लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सध्या जिल्ह्यात सुरु असलेल्या राजकीय घडामोडी अन् कानावर येत असलेल्या चर्चा या होत. लोकसभा निवडणुका कोणत्याहीक्षणी होतील, असे केंद्रस्तरावरचे सध्या तरी चित्र आहे. त्यादृष्टीने सत्ताधारी अन् विरोधकांनीदेखील कंबर कसली आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रचारप्रमुख नरेंद्र मोदी यांनी आतापासून जाहीरसभांचा धडाका उडविला असताना, संयुक्त पुरोगामी आघाडीच्या घटक पक्षांनीदेखील निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी सुरु केली आहे. राज्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसने जशी जागा वाढीसाठी व्यूहरचना आखण्याची तयारी केली तशीच तयारी कॉंग्रेसनेदेखील सुरु केली आहे. अगदी अलिकडे मोठ्या लोणीकरांचे झालेले जाहीर वक्तव्य बरेच काही बोलून जाते. लोणीकर म्हणाले होते, की शिर्डी व नगर दक्षिण हे दोन्ही मतदारसंघ हे कॉंग्रेसचेच आहेत. ते आम्ही आमच्याकडेच ठेवून घेऊ. या मतदारसंघांपैकी शिर्डी मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे तर नगर दक्षिण मतदारसंघ हा खुल्या प्रवर्गासाठी आहे. खुल्या प्रवर्गातून निवडणूक लढवू इच्छिणारे नेते कॉंग्रेसकडे आहेत. परंतु, शिर्डी मतदारसंघातून लढण्यासाठी कॉंग्रेसकडे जिल्ह्यातील प्रबळ उमेदवार नाही. किंवा, जे आहेत त्यांना निवडून येऊ दिले जाईल किंवा नाही हाही मोठाच प्रश्न आहे. या जिल्ह्याचे राजकारण नेहमीच लोणीभोवती फिरते. लोणीकरांची इच्छा काय, त्यावरही बरेच काही अवलंबून असते. सध्या दक्षिणेत लोणीकरांच्या चौथ्या पिढीतील तरुणतुर्क नेत्यांचा संचार बर्यापैकी वाढला आहे. युवक कॉंग्रेसच्या माध्यमातून सभासद नोंदणी व छोटे मोठे त्यांचे दौरेही सुरु आहेत. मोठ्या लोणीकरांच्या अगोदर या तरुणतुर्क नेत्यानेच दक्षिण मतदारसंघाची कॉंग्रेसकरिता मागणी केली होती. याचा अर्थ असा ध्वनित होतो, की लोणीकरांच्या कुटुंबातील कुणीतरी या मतदारसंघातून लढण्यास इच्छुक आहेत. तथापि, या मतदारसंघावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा दावा आहे. गतवेळेस या मतदारसंघात बंडखोरीचा तिढा निर्माण झाला होता. याही वेळेस चित्र फारसे वेगळे असेल असे वाटत नाही. त्यामुळे शरद पवार जेथे जागा वाढविण्यासाठी रणनीती आखत आहेत, तेथे दक्षिणेची ही जागा हाती लागेलच याची खात्री नसल्याने त्याऐवजी जागा वाटपात दुसरी जागा घेता येते का, याबाबीला पवारांचे पहिले प्राधान्य असणे सहाजिक आहे. उत्तर हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला आहे तर दक्षिणेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्राबल्य मोठे आहे. परंतु, दक्षिणेतील हे प्राबल्य नेत्यांच्या गटा-तटात विभागले गेले असून, याला हा चालतो तर त्याला तो चालत नाही, अशी परिस्थिती आहे. बर, पवारांच्या वजनदार दबावात सगळे एका पंगतीत बसतीलच याचीही खात्री नाही. यावेळेस पवार जसे जागा वाढविण्याचा आटापिटा करत आहेत, तसाच आटापिटा कॉंग्रेसदेखील करत आहे. अनुसूचित जमातीच्या मतदारसंघातून म्हणजे नंदुरबारमधून प्रचाराचा नारळ फोडण्याची परंपरा याहीवर्षी कॉंग्रेस कायम ठेवेल, यात काही शंका नाही. परंतु, अनुसूचित जाती, जमाती व राखीव मतदारसंघातील जागा वाढविण्यासाठीही कॉंग्रेसची वेगळी रणनीती आखली जात आहे. त्यानुसार, शिर्डी, सोलापूर, लातूर, अमरावती व रामटेक (नागपूर) या अनुसूचित जातीच्या मतदारसंघावर कॉंग्रेसने विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. सोलापूर, लातूर या मतदारसंघात सध्या कॉंग्रेसचा खासदार आहे. तर शिर्डी मतदारसंघातून गतवेळेस कॉंग्रेसच्या कोट्यातून रामदास आठवले यांना जागा सोडली गेली होती. तेथे त्यांचा पराभव झाला. परिणामी, कॉंग्रेसचे एक सिट हातचे गेले. अमरावती मतदारसंघात कॉंग्रेसच्याच कोट्यातून रा. सु. गवई यांना उमेदवारी दिली गेली होती. तेथेही त्यांचा पराभव झाला. या दोन्ही जागांवर शिवसेनेचे उमेदवार निवडून आले आहेत. जागा वाढविण्याच्या दृष्टिकोनातून शिर्डी मतदारसंघातून सध्या मुकुल वासनिक किंवा डॉ. नरेंद्र जाधव यांच्या उमेद्वारीची चर्चा सुरु आहे. डॉ. जाधव यांनी लोकसभा लढवावी, अशी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची इच्छा आहे. परंतु, डॉ. जाधव हे सुरक्षित मतदारसंघ शोधत असून, त्यादृष्टीने त्यांना लातूर हा अधिक सुरक्षित वाटतो. तर रामटेकमध्ये गतवेळेस निसटता झालेला विजय पाहाता, (अवघ्या १६ हजार मतांनी वासनिक जिंकले होते) यावेळेस वासनिक हे राज्यात सुरक्षित मतदारसंघाच्या शोधात आहेत. त्यादृष्टीने त्यांना शिर्डी हा मतदारसंघ सोयिस्कर वाटतो. अर्थात, त्यांच्या विजयासाठी लोणीकरांची साथ कितपत मिळणार हादेखील मोठा प्रश्न आहे. शिर्डी अन् नगर दक्षिण मतदारसंघ कॉंग्रेसला मिळाले तर मात्र लोणीकर वासनिकांना साथ देऊ शकतात. त्यासाठी दक्षिणेचा मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी कॉंग्रेसच्या या दोन्ही नेत्यांचे प्रयत्न राहणेही तसे सहाजिक आहे. ही राजकीय गणिते जुळून आली तर जी मंडळी लोकसभेचे मैदान मारण्यासाठी लंगोट बांधून तयार आहेत त्यांचे काय? असाही प्रश्न निर्माण होतो. दक्षिणेत शिवसेना- भाजपचे केडरबेस मतदान आहे. परंतु, त्याहीपेक्षा नेता पाहून होणारे मतदानही मोठे आहे. लोणीकर त्यादृष्टीने एकमेव असे नेते आहेत ज्यांना कॉंग्रेसचे नेते म्हटले जात असले तरी इतर पक्षातूनही त्यांचे नेतृत्व मानणार्यांची संख्या मोठी आहे. मी वर म्हटल्याप्रमाणे, नगर जिल्ह्याचे राजकारणच फार विचित्र आहे. या जिल्ह्यातील राजकारणात कधी काय चमत्कार घडेल अन् कधी काय उलथापालथ होईल हे सांगता येत नाही. गतवर्षीप्रमाणेच ही लोकसभा निवडणूकही चांगलीच वादळी ठरणार यात काहीही शंका नाही. सध्या जी शांतता दिसत आहे, ती वादळापूर्वीची आहे. वारे वाहात आहेत परंतु त्यांचा वेग अद्याप थोडा मंद वाटतो. वादळ येण्यापूर्वी जी शांतता भासत असते ती शांतता सध्या जिल्हा अऩुभवतो आहे, एवढेच!

वाक्चौरे, डॉ. जाधव अन् वासनिक!
नगर उत्तरच्या शिर्डी मतदारसंघातून सध्या डॉ. नरेंद्र जाधव अन् मुकुल वासनिक यांच्या नावाची वरिष्ठस्तरावर चर्चा सुरु असली तरी विद्यमान खा. भाऊसाहेब वाक्चौरे यांच्याबद्दलही कॉंग्रेसमधील काही नेते उत्सुक आहेत. गतवेळेस भाऊसाहेब वाक्चौरे हे ज्या पद्धतीने निवडून आले त्याच पद्धतीने ते पुन्हा निवडून येऊ शकतात, असा काहींचा कयास असला तरी काहींच्यामते वाक्चौरे हे शरद पवार व कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्याही संपर्कात आहेत. जिल्ह्याचे दक्षिण-उत्तर ध्रुव बदलून वाक्चौरे यांना निवडून आणणे असा एक राजकीय चमत्कार साईंच्या शिर्डीत पुन्हा घडू शकतो. तर काही नेत्यांच्या मते याही वेळेस आपला माणूसविरुद्ध बाहेरचा माणूस असा गतवेळेचाच संघर्ष या मतदारसंघात पाहावयास मिळेल. वाक्चौरेविरुद्ध डॉ. जाधव यांच्यापेक्षा वाक्चौरेविरुद्ध मुकुल वासनिक अशी लढत राहील, अशी दाट शक्यता वरिष्ठ नेत्यांनी वर्तविली आहे. या मतदारसंघात लढत कशीही होऊ द्या, लोणीकर काय कौल देतात, यावर सर्वकाही अवलंबून राहणार आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा