नगर शहर : बिना मायबापाचं लेकरु!
.......
कधीकाळी वडापाव विकणारे, हातभट्टीची दारु विकणारे अन् सायकलवरुन दूध विकणारे या नगर शहरानं मोठे केले. ही माणसे गुंडगिरी, दादागिरी अन् भावनिकतेच्या राजकारणाचा आधार घेऊन मोठी झाली. सर्वसामान्यांचे आपणच कैवारी आहोत, असा डिंडोरा पिटणार्या या नेत्यांनी शहराच्या विकासासाठी काय केले? हा प्रश्न जर त्यांना विचारला तर त्यांची तोंडं फट्दिशी पडतात. शहराला नुसती अवकळा आली असून, औरंगाबाद शहराच्या अगोदरची असलेली येथील औद्योगिक वसाहत उजाड पडत चालली तरी त्याचे कुणाला सोयरसूतक नाही. व्यापारीपेठ, शहरातील रस्ते, विविध सोयीसुविधा यांच्या विकासाबाबत शहरातील पुढार्यांना जसे काही सोयरसुतक नाही; तद्वतच जिल्ह्यातील तीनही मंत्र्यांना जिल्ह्याच्या या मुख्यालयाबद्दल काहीही कनवळा नाही. आपला बालेकिल्ला अन् गड सांभाळण्यात मश्गुल असलेले हे मंत्री अन् वजनदार नेते शहराच्या विकासासाठी काही हालचाल करतील किंवा नाही, हा मोठा यक्ष प्रश्न आहे. मायबाप नसलेल्या लेकाराची व्हावी तशी अवहेलना या ऐतिहासिक शहराची सुरु आहे.
....
विकासाचा ठणठणाट असलेलं नगरसारखे ऐतिहासिक शहर बिनामायबापाचं लेकरु ठरलं आहे. या शहराच्या शेजारी असलेले औरंगाबाद, पुणे, नाशिकसारखी शहरे विकासाची उड्डाणे घेत असताना, नगरकर आजही रस्त्यावरील खड्ड्यातून बाहेर पडायला तयार नाहीत. या जिल्ह्यात तीन मंत्री आहेत. राजकीय वजन असलेले डझनभर नेतेही आहेत. परंतु, प्रत्येकाने आपला राजकीय गड भला अन् आपण भले असा संकुचित विचार चालवला असून, या विचारानेच या शहराची वाताहात झाली. विकासाची दृष्टी असलेला नेताच या शहरात नाही. शहरात सक्रीय असलेल्या राजकीय पक्षांतच सवतेसुभे निर्माण झालेले आहेत. सोयर्याधायर्याचे राजकारण करणारे शहराच्या विकासासाठी राजकारण करायला पुढे येत नाहीत. शहराने पुढे आणलेलं नेतृत्व भावनिक राजकारणापलिकडे विचार करायलाच तयार नाही. कधीकाळी वडापाव, हातभट्टीची दारू अन् सायकलवरुन दूध विकणार्यांना या शहराने त्यांचा पुढारी केले. हे पुढारी आता राजकारणात जम बसवून आहेत. ज्या नेत्यांना शहराने ‘दम’दार पुढारी केले ते पुढारीच या शहराची वासलात लावत असताना, नगरकर अजगरासारखे सुस्तावून पडले आहेत. शिवसेना-भाजपच्या हाती सत्ता सोपाविल्यानंतर शहराचा विकास होईल, अशी अपेक्षा नगरकरांना होती. परंतु, रस्त्यावरील खड्डे, सुविधांची वाणवा अन् विकासाचा खेळखंडोबा या पलिकडे या शहरात काहीही पाहावयास मिळत नाही. शिवसेना- भारतीय जनता पक्षाने नगरकरांचा जसा अपेक्षाभंग केला; तसाच कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसनेदेखील केला. शहरात राष्ट्रवादी कॉंग्रेसची ताकद मोठी आहे. परंतु, नगर शहर आणि या शहराची महापालिका शिवसेनेला आंदण देण्याचे राजकीय काम राष्ट्रवादीने या शहरात केले. राजकीय साटेलोट्याचे असे दुर्देवी चित्र क्वचित कोण्या शहरात पाहावयास मिळत असेल. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शहराच्या विकासासाठी झटायला तयार नाहीत. नाही म्हटले तर मधल्या काळात पालकमंत्री असताना बबनराव पाचपुते यांनी शहरातील अतिक्रमणे हटविण्याची ठोस भूमिका घेऊन प्रशासन कामाला जुंपले होते. त्यामुळे शहराचा थोडाफार श्वासही मोकळा झाला. परंतु, आता ज्या रस्त्यावरील अतिक्रमणे हटविली गेली तेथे पुन्हा अतिक्रमणाचा विळखा पडल्याचे पाहावयास मिळत आहे. मताचे सोयीस्कर राजकारण करणार्यांनी आपली मतपेटी शाबूत ठेवण्यासाठी शहर विकासाला खीळ घातली असून, त्यांचे फायदेशीर राजकारण होत असले तरी नगरकरांच्या नशिबी मात्र दुर्देवाचे दशावतार आले आहेत. जिल्ह्यात कॉंग्रेसचे दोन मंत्री आहेत. नगर हे शहर जिल्ह्याचे मुख्यालय असून, या मुख्यालयाच्या विकासासाठी या दोन्ही मंत्र्यांचे योगदान काय? हा सवाल केला गेला तर त्याचे उत्तर नकरार्थी येते. स्थानिक नेतृत्व कोण्याही पक्षाचे असो, ते दुबळे आहे हेही तितकेच खरे. परंतु, आपण ज्या जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करतो, त्या जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या विकासाचा एजंडा राबविण्यात जिल्ह्यातील तीनही मंत्र्यांची सोयीस्कर टाळाटाळ करावी व त्यासाठी पक्षीय अभिनिवेष पाळावा, ही बाब मोठी शोकांतिका आहे. जिल्ह्यातील नेतृत्वाला विचारात घेतल्याशिवाय या राज्याचे राजकारण पुढे सरकत नाही. राजकीयदृष्ट्या वजनदार नेते या जिल्ह्यात आहेत. परंतु, हे नेते आपला बालेकिल्ला अन् राजकीय गड सोडून दुसरीकडे पाहायला तयार नाहीत. आता महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. कॉंग्रेसने नुकताच कोठे शहर-जिल्हाध्यक्ष दिला. या शहराध्यक्षाला पक्षांतर्गत राजकारणाने सतावून सोडले असून, शहराचे प्रश्न त्यांच्याकडून नेतृत्व पातळीवर पोहोचविले जात नाहीत. ज्या महापालिकेने शहराच्या विकासासाठी पुढाकार घेणे अपेक्षित आहे. सुनियोजित विकास घडवून आणणे अपेक्षित आहे. त्या महापालिकेत काय चालू आहे हेच कळायला मार्ग नाही. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात मुरुम टाकण्याचे काम घेण्यासाठीही ठेकेदार तयार होत नाहीत. रस्ते तयार करणे तर फार दूरची बाब. महापालिका नियोजन करते, कामेही तयार करते; परंतु ही कामे घेण्यासाठी ठेकेदारच तयार होत नाहीत. कारण, यापूर्वी या ठेकेदारांनी केलेल्या कामांची देयकेच त्यांना मिळालेली नाहीत. पदरमोड करून कामे केल्यानंतरही पुन्हा घसघशीत टक्केवारी देण्याची वेळ जर या ठेकेदारांवर येत असेल तर काय डोंबल्याचा शहराचा विकास होईल. भावनिक राजकारण करून भलेही मते मिळवता येतील. परंतु, शहर विकासासाठी एक दृष्टीकोन असावा लागतो. तो दृष्टीकोनच स्थानिक नेतृत्वाकडे नाही. शहरातील प्रत्येक पुढारी केवळ आपल्या पायाजवळ पाहात असून, विकासासाठी पुढाकार घेण्याची कोणाचीही मानसिकता नाही. शहरात धड रस्ते नाहीत. प्रत्येक रस्त्यावर अतिक्रमणांचा विळखा आहे. शहराची औद्योगिक वसाहत भकास पडली असून, नाशिक, औरंगाबादच्या पंक्तीत जाऊन बसेल, अशी कोणतीही बाब या शहरात नाही. नगर शहरापेक्षा श्रीरामपूर, संगमनेर, लोणी यासारखी छोटी शहरे पुढारली आहेत. केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना आणून शहराचा विकास घडविण्यासाठी राजकीय नेतृत्व प्रगल्भ असावे लागते. त्या नेतृत्वाची विकासाची तळमळही असावी लागते. नगरला कुणीही वाली नसल्याने विकास योजना आणण्यासाठी कुणीही पुढाकार घेत नाही. महापालिका प्रशासन पुढाकार घेऊन काही योजनांसाठी फायली पाठवते. परंतु, शिवसेनेचा बालेकि ल्ला असल्याने सत्ताधारी कॉंग्रेस व राष्ट्रवादीचे नेते या फायली मंजूर कशा होणार नाहीत, यासाठीच प्रयत्न करतात. या नेत्यांच्या झारीतील शुक्राचार्याच्या भूमिकेमुळेच हे शहर बिना मायबापाचे लेकरु ठरले आहे. केंद्रीय योजनांसाठी नुकतीच महापालिका प्रशासनाने ९८ कोटी रुपयांची फाईल टाकली होती. या फायलीवर राजकीय वजन नसल्याने ती अद्यापही दिल्ली दरबारी धूळ खात आहे. परंतु, श्रीरामपूरसाठी जयंत ससाणे यांनी आपले राजकीय वजन वापरून ६० कोटी रुपयांपर्यंतचा निधी खेचून आणला. नगर हे जिल्ह्याचे मुख्यालय असतानाही संगमनेर, श्रीगोंदा किंवा लोणी, श्रीरामपूरसारखी छोटी शहरे विकसित होत आहेत. श्रीगोंदा किंवा संगमेनरची बाजारपेठ तर प्रसिद्धच आहे. परंतु, नगर येथील बाजारपेठेचे हाल कुत्रे खात नाहीत, अशी स्थिती आहे. गुंडगिरीच्या जोरावर राजकारण करायचे, आपल्याच गुंडगिरीला भावनिक मुद्द्यांचा मुलामा चढवायचा अन् भीती व दहशतीच्या खाली निवडणुका जिंकायच्या हीच अघोरी राजकीय नीती या शहरातील पुढारी मंडळी राबवित आहे. शहर विकासाची झाली वाताहात याच गुंड राजकीय नीतीचा परिपाक ठरला आहे. संगमनेरला मायबाप आहेत, लोणी अन् राहात्यालाही मायबाप आहेत, श्रीगोंद्यालाही मायबाप आहेत. परंतु, मायबापाविना पोरके असलेले शहर म्हणजे हे नगर शहर होय. शहराला ऐतिहासिक वारसा आहे. लोकलढ्याचे केंद्रस्थान म्हणून या शहराकडे पाहिले जाते. स्थानिक नेतृत्व कूचकामी अन् राज्यस्तरीय नेतृत्व शहराकडे कानाडोळा करत, आपल्याच गडकिल्ल्यात मश्गुल असल्याने या शहराचे गलिच्छ, ओबडधोबड अन् अविकसित रुप कधी पालटेल, हे खुद्द ब्रम्हदेवच सांगू शकेल.
.........

भीती, दहशत अन् गुंडगिरीच्या जोरावर निवडणुका!
आता महापालिकेची निवडणूक तोंडावर आली आहे. दैनिक देशदूतने शहरातील प्रत्येक प्रभागाचा पंचनामा केला. कोणत्याही प्रभागात सोयीसुविधा परिपूर्ण नाहीत. प्रत्येक निवडणुका भीती, दहशत अन् गुंडगिरीच्या जोरावर लढल्या व जिंकल्या जातात. स्थानिक भावनिक मुद्द्यांना ढाल करून या निवडणुका जिंकल्या जात असल्याने शहराचे प्रश्न आहे तेच आहेत अन् यापुढेही ते तसेच राहतील. गत २५ वर्षात औरंगाबाद झपाट्याने बदलले, पुणेही बदलले, नजीकच्या नाशिकचा तर कायापालट झाला. परंतु, नगर शहराला ही अवकळा का आली, याचे उत्तर शहरवासीयांनाच शोधावे लागेल अन् ते आता मतदान यंत्रातून द्यावे लागेल. अजगरासारखे सुस्त राहिले तर पुढील शंभर वर्षानंतरही शहराची हीच अवकळा कायम दिसेल.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा