मी ऑफिसला येण्यासाठी निघालो, की केयूर माझ्यामागे ऑफिसला येण्यासाठी तगादा लावतो. आता त्याला पप्पासोबत ऑफिसला येणे म्हणजे मजा वाटते, परंतु लेकाचा जेव्हा स्वतःच्या ऑफिसात जायाला लागेल, तेव्हा कळेत त्याला ऑफिस म्हणजे काय आहे ते! आम्ही दोघेही नोकरी करत असल्याने त्याला घरी सांभाळायला कुणी नाही. शेजारच्या काकू गावाला गेल्यामुळे मला दोन दिवस (२७ व २८ जून २०११) ला नाईलाजाने दोन तासांकरिता केयूरला ऑफिसला न्यावेच लागले. माझी बायको तिच्या ऑफिसातून घरी जाताना त्याला सोबत घेऊन गेली. ऑफिसमध्ये कॉम्प्युटरवर रिकामटेकडे उद्योग करताना त्याच्याकडे कौतुकाने पाहण्याचा मोह मला आवरता आला नाही. लेकाचा मोठ्यापणी कोण होणार देव जाणे!!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

खसखसच्या शेतीचे वास्तव!