नरेंद्र मोदीजी, गांधींच्या वाटेला जाऊ नका! फोकस/ पुरुषोत्तम सांगळे, निवासी संपादक, दैनिक जनशक्ति, पुणे 8087861982 खादी ग्रामोद्योग मंडळाच्या डायरी अन् कॅलेंडरवरून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना हटवून त्यांची जागा घेण्याचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. त्याबद्दल देशभर मोदी यांची निंदा सुरुच आहे. मोदी हे रा. स्व. संघाचे प्रॉडक्ट आहे, अन् गांधींना संपविण्यासाठी संघाने काय प्रयत्न केलेत ते जगजाहीर आहे. इतक्या वर्षांत गांधींना संपविण्यास त्यांना अजिबात यश आले नाही. उलटपक्षी गांधी प्रत्येकाच्या हृदयात आढळस्थान प्राप्त करून बसले. गांधी नि:शस्त्र आहेत, अहिंसक आहेत, परंतु त्यांनी बलाढ्य अशी इंग्रजी सत्ता हाती शस्त्रही न घेता उलथावून टाकली होती. हे नरेंद्र मोदी यांनी लक्षात ठेवावे. गांधींच्या वाट्याला जाऊ नका, ते तुम्हाला परवडणारे नाही, हेच या निमित्ताने मोदी यांना सूचवावेसे वाटते! -- माणूस स्वतःच्याच प्रेमात किती वेडं होऊ शकतो, याचे जीवंत उदाहरण पहायचे असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पहा! या माणसाने चक्क राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना हटवून त्यांच्या जागी ...
या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट
खसखसच्या शेतीचे वास्तव!
खसखसच्या शेतीला अफूची शेती म्हणायचे व ही शेती करणारे शेतकरी राष्ट्रद्रोही ठरवायचे, हा जो उपद्व्याप आबा पाटलांनी व मीडियातील काही लोकांनी चालविला आहे तो थांबविला पाहिजेत. ऊस, द्राक्ष, मोहाची फुले यापासून जशी दारु तयार होते. तसेच, अलिकडे सरकार ज्वारी, मका या पिकांपासूनही दारू पाडत आहे. परवाना दिला की दारु वैध ठरते. ज्या खसखसला समाजद्रोही पीक म्हणून आबा पाटील घसा फाडत आहेत, ते पीक अनेक रोगांत चांगले औषध आहे. आबा पाटलांच्या घरात खसखस मसाल्याचा पदार्थ म्हणूनही वापरली जाते. काही शेतकरी गुन्हेगारी टोळ्यांशी हातमिळवणी करुन खसखसची शेती करत आहेत. त्या शेतकर्यांवर पोलिसांनी जरुर कारवाई केली पाहिजेत. परंतु, सर्वच खसखस उत्पादक शेतकरी या देशद्रोही कृत्यांत सामील नाहीत. खसखस हे फायदेशीर पीक असून, त्यामुळे शेतकर्यांना चांगला आर्थिक लाभ होतो. आबा पाटलांनी खसखस पीक घेण्यासाठी वाटले तर परवाना पद्धत लागू करावी, पोलिसांच्या निगरानीखाली हे पीक घेऊ द्यावे. खसखस तयार झाली की कापूस एकाधिकारप्रमाणे हे पीकही सरकारनेच खरेदी करावे. त्यात अवैध असे काही ठरणार नाही, शेतकर्यांना दोन पैशाचा लाभ होईल. खसखसच्या शेतीमा...
‘नालायकांची’ साथ सोडणे म्हणजे ‘मध्यावधी’! - फोकस/ पुरुषोत्तम सांगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व राज्यातील जाणकार नेते शरद पवार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना ‘नालायक’ लोकांची संगत सोडण्याचा सल्ला दिला आहे. हा सल्ला वडिलकीच्या नात्याने खचितच दिला नसेल; राजकीय भूमिकेतूनच तो दिला गेला असेल, असे वाटते. पवारांच्या मनात काय आहे, हे कधीच महाराष्ट्राला सहजासहजी कळले नाही. परंतु, सरकार पाडण्याचा पवारांचा अनुभव तसा दांडगा आहे. उद्धव यांनी उद्या कथित नालायकांची साथ सोडलीच तर महाराष्ट्राला मध्यावधीला सामोरे जावे लागेल. त्याचा फायदा पवारांपेक्षा शिवसेनेलाच होईल, हे सांगण्यासाठी कुण्या ज्योतिष्याची गरज नसावी! --- एकवेळ मासा पाण्याशिवाय जीवंत राहू शकेल; परंतु शरद पवार सत्तेशिवाय राहू शकत नाहीत, असे गमतीने म्हटले जाते. ते कदाचित खरेही असेल. परंतु, सत्ता गेल्याचे शल्य पवारांना कधी जाणवले नाही. सत्ता गेली तशी त्यांनी आपल्या चाणाक्षपणे आणलीही. आतादेखील मोदी लाटेच्या भंपकगिरीत पवारांची राज्यातील सत्ता गेली. ही भंपकगिरी दोन वर्षातच उघड पडल्याने गेलेली सत्ता परत ये...

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा