निर्मलबाबाची दुकानदारी; लोकशाहीचे अपयश!
निर्मलबाबासारख्यांची चांगली चाललेली दुकानदारी हे भारतीय संसदेचे आणि लोकशाही व्यवस्थेचे अपयश आहे. संसदेत बसलेल्या लोकनियुक्त लोकांकडून लोकांची प्रश्ने सुटत नाहीत म्हणून ही माणसे निर्मलबाबासारख्यांच्या नादी लागतात. भारत आणि इंडिया हे आपल्या देशाचे पडलेले दोन सामाजिक तुकडे आहेत. भारतीयांच्या समस्या वेगळ्या आहेत तर इंडियन लोकांच्या अडचणी वेगळ्या आहेत. परंतु, निर्मलबाबांच्या दरबारात हे दोन्ही सामाजिकस्तर हजेरी लावतात व आपल्या अडचणी, समस्या सांगतात. त्यांच्यावर बाबा म्हणतो त्याप्रमाणे गुलाब फुल, दहिवडा देऊन देवाची कृपा होते का नाही, हे माहीत नाही. परंतु, देव, धर्माच्या नावाखाली या दोन्ही लोकांचे शोषण होते एवढे मात्र खरे. धर्म हे मानसिक गुलामगिरी कायम राखण्याचे प्रमुख साधन आहे. जोपर्यंत धर्म असेल तोपर्यंत निर्मलबाबासारख्यांची दुकानदारी चांगली चालेल. अपयशी लोकशाहीमुळे असल्या निर्मलबाबांना कोणतीही अडकाठीही येणार नाही.
....
मध्यप्रदेशातील चिंतामणी नावाच्या युवतीवर गुदरलेला एक प्रसंग वाचण्यात आला. या युवतीचे आई - वडिल गावातील गावगुंडांनी मारुन टाकले. तिच्या नातेवाईकांनी तिची वडिलोपार्जित संपत्ती हडप केली अन् या युवतीला मुंबईतील कुंटणखान्यात विकून टाकले. कोणत्याही युवतीच्या नशिबी येऊ नये असे दुःख या युवतीच्या वाट्याला आले. या युवतीच्या दुःखाला प्रसारमाध्यमांनी किती वाचा फोडली, तिला न्याय मिळाला का? याबाबत फारसे काही कळले नाही. दुसरी एक मनाला चटका देणारी बाबही वाचण्यात आली. या देशातील ७० टक्के लोकांकडे जेवढा पैसा असावा तेवढा पैसा केवळ ८२०० कुटुंबांकडे एकवटलेला आहे. टाटा - बिर्लासारख्या कुटुंबांनी देशातील ७० टक्के लोकांची संपत्ती स्वतःकडे गोळा करुन ठेवली. या दोन प्रसंगातून काय लक्षात येते. या देशातील ७० टक्के लोकं भारतात राहतात त्यांची दुःखे आणि वेदना वेगळ्या आहेत तर इंडियात राहणार्या ३० टक्के लोकांच्या समस्या वेगळ्या आहेत. ७० टक्के लोकांना सामान्य जीवन जगतानाही अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. चिंतामणीसारख्या युवतींची कुंटणखान्यात विक्री होते, त्यांच्या शरीराचा व्यापार होत आहे. तर काही लोकांच्या नशिबी दोनवेळच्या जेवणाची भ्रांत पाचवीला पुजलेली आहे. ३० टक्के उच्चभ्रुंच्या समस्या यापेक्षा वेगळ्या आहेत. त्यांना झोप येत नाही म्हणून ते उच्चप्रतीचे मद्य पितात. कामाच्या मानसिक तणावातून विरंगुळा मिळावा म्हणून ते चिंतामणीसारख्या तरुणींना शेजशय्येला बोलावतात. तरीही त्यांचा ताण कमी होतो किंवा नाही हे त्यांनाच कळोत. भारतीयांच्या व इंडियातील लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी संसद नावाची यंत्रणा आपल्या देशात अस्तित्वात असून, या संसदेत आदळआपट करून लोकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला जातो. त्यासाठी कायदे, नियम व नियोजन केले जाते. हे करताना लाखो कोटी रुपये खर्चही केले जातात. एवढ्या पैसांचा चुरडा केल्यानंतरही समस्या सुटत नाहीत म्हणून भारतीय आणि इंडियन असे दोन्ही माणसे शेवटी निर्मलबाबासारख्यांच्या दरबारात हजेरी लावतात. संसद अपयशी ठरली म्हणून निर्मलबाबांचा दरबार जोरात आहे. या दरबारात आपले गार्हाणे घेऊन शरीरविक्रयाद्वारे कमावलेल्या दोन हजार रुपयांची फी भरून चिंतामणीही जाते. ती सांगते बाबा अमका तमका अन्याय झाला, काय करू? निर्मलबाबा तिला गुलाबाचे फुल हुंगायला देतात, सांगतात आता जा तुझ्यावर देवाची कृपा सुरु होईल. दोन हजार रुपयांच्या बदल्यात गुलाबाचे फुल घेऊन चिंतामणी दरबाराबाहेर पडते. तिच्यावर देवाची कृपा काय होणार? कुंटणखान्याच्या दलदलीतून ती बाहेर पडत नाही तेव्हा हाच बाबा सांगतो, बेटा हे तुझ्या पूर्वजन्माचे फळ आहे ते भोगावेच लागेल. याच बाबाकडे एखादा टाटा - बिर्लाच्या खानदानातील लाखोंच्या नोटा घेऊन जातो. तेव्हा हाच निर्मलबाबा त्याला दहिवडा देऊन सांगतो, तुझ्यावर देवाची कृपा होईल. ही कृपा कशासाठी तर स्वीस बँकेत दडविलेल्या काळ्या पैशाचे बिंग फुटू नये म्हणून. देव या गर्भश्रीमंतावर कृपा करतो, त्याचे बिंग फुटत नाही. निर्मलबाबा म्हणतो त्याप्रमाणे हेदेखील पूर्वजन्माचेच फळ का? काय गंमत आहे पाहा, धर्म हा मानसिक गुलामगिरी कायम ठेवण्याचे महत्वपूर्ण साधन आहे. ग्लोबलायझेशनच्या युगात हे साधन फार प्रभावी ठरले असून, त्यामुळे अनेक बाबा, बुवा मालामाल झाले आहेत. सुरुवातील ही बाबामंडळी कथा सांगत होती, प्रवचने करत होती. या धंद्यातही चांगली कमाई झाली. नंतर ही बाबामंडळी योग शिकवू लागली. जडीबुटी देऊ लागली. धर्माच्या नावाने हा धंदाही चांगला चालल्याने ही मंडळी राजकारणाकडे वळली. आतापुढे ही बाबा, बुवा मंडळी देवाचा कृपाशीर्वाद विकण्याचा धंदा उघडून बसली आहेत. निर्मलबाबासारख्यांचा हा धंदाही जोरात सुरु असून, त्याची वार्षिक उलाढाल २६८ कोटी रुपयांपर्यंत जाऊन पोहोचली. विविध चॅनलचा वेळ खरेदी करुन या बाबांना पैशाच्या जोरावर जोरदार प्रसिद्धी करता येते. याच प्रसिद्धीने एकदा टाटा - बिर्ला या बाबांकडे आपल्या समस्या घेऊन येतो तसेच एखाची चिंतामणीही आपली समस्या घेऊन येते. बाबाला व्यक्ती कोण याच्याशी घेणेदेणे नाही. दोघांकडूनही पैसे मिळतात यातच त्याला समाधान आहे. धर्माच्या नावावर चालणारी मानसिक गुलामगिरी जोपर्यंत कायम असेल तोपर्यंत निर्मलबाबांसारख्यांची दुकानदारी चांगलीच सुरुच राहणार आहे. लोकांच्या समस्या सोडविण्याचे काम ज्यांनी करायला हवे, ती संसद आणि त्यात नांदणारी लोकशाही अपयशी ठरल्यानेच या दुकानदारीला सुगीचे दिवश आले आहेत. संसदेच्या अपयशामुळेच एकच नव्हे तर लाखो निर्मलबाबा निर्माण होत राहतील. भारत आणि इंडिया या दोघांमध्ये राहणार्या लोकांचे शोषण ते करतच राहतील!

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा